रक्ताच्या नात्याहूनही आगळी,
ह्या नात्याची किमया,
ना कोमेजे सुगंधीत ह्या
मैत्र फुलाची काया |
दु;ख-संकटी सदा पाठीशी,मैत्रीची छाया,
मैत्रीसारखी जगी नाही, धन-संपदा-माया |
मैत्रीत नाही वजाबाकी,
अन् नाही भागाकार,
नफा-तोटाही नसे त्यामधी,
नच असे व्यवहार |
जात-पात ना वय जाणिते, निरपेक्ष-निर्मळ मैत्री,
शब्दाविणही मुक्त भावना, दिसून येते नेत्री |
विश्वासाने विसावण्याचा,
खांदा एक मैत्रीचा,
निर्णयासाठी कधी वाटे तो,
वडही आधाराचा |
जन्माने जे मिळते नाते,
त्याचा गोफ ढिला जरी पडे,
मैत्रीचे नाते चिरंतर अन्
अभंग अभेद्य कडे |
आवडीने गुंफून जीवापाड हे
जपलेले नाते,
आयुष्याच्या अंतापोत्तर
सोबत ते करते |
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply