आम्ही जातो अमुच्या गावा .. रामराम अमुचा घ्यावा … हैदराबादहून परत मुंबई
काल शनिवार म्हणजे २२ जून हा आमचा हैदराबादमधला शेवटचा दिवस होता …
जवळ जवळ पावणे तीन वर्षाच्या नंतर आम्ही हैदराबादला रामराम केला . .. आणि संध्याकाळी मुंबईला प्रस्थान केलं… शुक्रवार आणि शनिवार फार जड गेले … शनिवारी सकाळी तर फारच …. गाडीतून जुने शहर … चारमिनार .. अफझलगंज … कराची बेकरी … हिमायत नगर … हुसेन सागर असा एक मोठा फेरफटका मारला … सगळं डोळ्यात भरून घेतलं … मन फार जड झालं … डोळ्यांच्या कडा ओलावल्या …
गेल्या पावणे तीन वर्षांचे हे सुंदर ऋणानुबंध … मनात अनेक घटना गोष्टींची गर्दी झाली … पूर्व घाटाच्या इथल्या डोंगररांगेत चालत केलेली भटकंती … त्यावरचे गोवळकोंडा … भोंगीर … बिदर .. रचाकोंडा … मेडक असे अनेक किल्ले …वारांगलच्या भद्रकाली देवीचा आशीर्वाद …. श्रीशैलम … यागंटी .. यादगिरी गुट्टा … श्री अहोबिलमचे स्वामी नृसिंह … आलमपूरची जोगुळंबा …. मंत्रालय …. हिंदूंपुर-लेपाक्षी …. गोवळकोंडा इथल्या इब्राहिम बागेतला दर्गा … बिदर… पेनुगोंडा इथला जागृत दर्गा ….मेडकचं चर्च … . अगदी इथल्या दक्खनच्या पठारावरचे बंगीनापल्ली … रसालू हे मधुर आंबे … अमृतासारखी गोड सीताफळं … लाल पेरू … वाटोळी साखरेसारखी गोड द्राक्ष … इथल्या ताज्या पालेभाज्या …कराचीची शुद्ध शाकाहारी बिस्किटं … पुल्ला रेडडीचा जिभेवर ठेवताक्षणी विरघळणारा शुद्ध तुपातला म्हेसूर हलवा …
इथले अनेक जीवाभावाचे मित्र …. किती किती गोष्टी आहेत … ज्या कधीही विसरू शकत नाही …. जरी मुंबईला येण्याची खूप ओढ होती तरी इथून निघताना मात्र पाय आणि मन जड झालं … या सगळ्या आठवणी डोळ्यात गोळा झाल्या…
शेवटी संध्याकाळी विमानाने मुंबईकरता निघालो … आम्ही जातो अमुच्या गावा .. रामराम अमुचा घ्यावा … विमान उंच गेल्यावर या भूमीला परत एकदा डोळे भरून बघितलं …….
खूप लिहिलंय मी पण अजून कित्येक गोष्टी आहेत .. ज्या लिहायच्या आहेत … लिहेन हळूहळू …
(कोलाजमधला मुख्य फोटो फोटोवरून काढलाय .. )
— प्रकाश पिटकर
Leave a Reply