दिनांक ११ मार्च, २०१५ दै.प्रत्यक्षच्या ‘आंतराष्ट्रीय’ बातम्यात सर्व जगाला हादरवून टाकणारी आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी “अर्थसहाय्य नाकारले तर युरोपात दहशतवादी घूसवू” हि ग्रीसच्या संरक्षणमंत्र्याच्या धमकीची बातमी वाचण्यात आली.
ग्रीसला देशाला २४० अब्ज युरो डॉलरचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते त्यापैकी फक्त ७.५ अब्ज युरो निधी मिळण्याचेच बाकी होते. परंतु पुढचा मागचा काही विचार न करता ‘युरोपने आर्थिक संकटात आम्हांला एकटे सोडले तर, पूर्ण युरोप स्थलांतरितांनी भरून टाकू” एवढे बोलले असते तर गोष्ट समजण्यासारखी होती. परंतु “लक्षावधी आर्थिक स्थलांतरीतांच्या लाटांमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांचाही समावेश असू शकतो हे जर्मनीने लक्षात ठेवावे” अश्या आशयाचे विधान ग्रीसच्या संरक्षणमंत्र्यांनी करावे म्हणजे उदविग्नतेतून आलेले आणि परीपक्वताहीन वाटते.
आधीच काही देशांचे दहशतवाद्यांमुळे आर्थिक आणि जीवित नुकसान भरपूर झाले आहे. दहशतवादामुळे युरोप आणि अखातातील काही राष्ट्रे दहशतवादाच्या सावटाखाली वावरत आहे त्यात अशी वक्तव्ये म्हणजे दहशतवाद्यांस शंभर हत्तींचे बळ पुरविण्यासारखे आणि दहशतवाद्यांच्या हातात आयतेच कोलीत दिल्यासारखे आहे.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply