फू बाई, फू, फुगडी फू
सासू-सुनांचे मैं मै तू ग
मै मै तू.
एक काढी खोडी तर
दुसरी घेई छडी
पुढच्या क्षणी चाले
यांची पुन्हा लाडीगोडी … आता फुगडी फू
छान छान साड्या नेसून
घरात असतात फिरत
ठाऊक नाही कशी
यांची इस्त्री नाही चुरत … फुगडी फू
रोज रोज यांच्या घरी
शिजे नवे प्रकरण
माहित नाही कधी करतात या
पोळ्या भातवरण… फूगडी फू
पहाल तेव्हां ह्यांच्या घरी
असते कसली पूजा
भांडभांड भांडतात तर
कधी करतात मजा… फुगडी फू
दागदागिने कपडेलत्ते
बर्फी लाडू पेढे
तरी यांची सून सदा
रड, रड, रडे – फुगडी फू
सांगा कधि अस्से असते
आपल्या घरी वळण
तरी आम्ही दळत बसतो
सास-बहू दळण… आता फुगडी फू
— सुधा मोकाशी
Leave a Reply