फुले अनंताची देखणी,
मंद,मंद सुवासी,–!!!
बागेत जागा खास त्यांची
स्वागतां अतिथीच्या प्रारंभी,
जास्वंदीचा तोरा मोठा,
श्रीगणेशांचे लाडके,–
ऐट त्यांची घ्या पाहुनी,
प्रथम हाती धरावे नेटके,
मदनबाणांची छाप विलक्षण,
निसर्गाचीच किमया ती,
सुवासिक, दिमाखी त्याची,
लावे दुनिया विसराया खाशी,
बकूळ ती फुलतांना,
केवळ पहांत रहावे,
सडा पडतांच अवनीवरती,
जीव जसा सांडत रहावे,–!!!!
गुलाबाला पाहण्या विशेष,
नजर’ ती लागे,—
पाकळी अन् पाकळी सारखी,
आंत आंत गुंतलेले धागे,
सायली नाजूक साजूक,
तलम पाकळी अगदी,
हात जपून लावण्या,
धाडस करा थोडके,–!!!
मोगरा उत्फुल्ल होतां,
न कुणाचेच ऐके,—
आकर्षित करीत जगा,
वाऱ्यावर घेत झोके,
भुईचाफा जरा गंधाळता,
जाता त्याकडे ओढले,—
खाली वाकून त्याला,खुडतां,
सौंदर्यांची ‘होड’ लागे,–!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply