नवीन लेखन...

फ्युचरग्रुप चे किशोरबियाणी

देशात एक काळ असा होता की प्रत्येक मध्यम वर्गातील कुटुंब बिग बाजारच्या सेलची वाट पाहायचा. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६१ रोजी राजस्थानात झाला. कारण या सेलमध्ये महत्त्वाच्या वस्तूंवर मोठी सवलत मिळायची. ‘सबसे सस्ता, सबसे अच्छा’, कंपनीची टॅगलाइनची घरा घरात पोहोचली होती.बिग बाजार हे किशोर बियाणी यांचा ब्रांड होता.

रिटेल किंग म्हणून ओळख असलेल्या किशोर बियाणी हे KB या नावाने प्रसिद्ध आहेत. किशोर बियाणी यांचा जन्म राजस्थानमधील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा एकेकाळी राजस्थानहून धोती आणि साड्यांचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले होते. वयाच्या १४- १५ व्या वर्षी किशोर बियाणी हे मुंबईच्या सेंचुरी मार्केटमध्ये जाऊ लागले होते. अभ्यासात फारसे चांगले नव्हते. वडील आणि दोन चुलतभावांबरोबर काम करायचे, पण किशोर यांना त्यांचा कामाचा अप्रोच आवडला नाही. मग स्वत: ची गिरणी लावून स्टोनवॉश विकायला सुरुवात केली. ते मुंबईतील छोट्या दुकानात विकत असत. त्या काळी, त्यांच्या स्टोअरचा देखील ट्रेड बॉडीत समावेश केला जात नव्हता.

वयाच्या २२ व्या वर्षी मुंबईत किशोर यांनी ट्राऊजर बनवायला सुरुवात केली, जे चालूच होते. १९८७ साली त्यांनी पॅटलूनची सुरूवात केली होती. मॅनस वेअर प्रा. लि. मध्ये पॅटलूनच्या नावावर कपडे विकले जात होते. पॅटलून हे नाव निवडले गेले कारण ते उर्दू शब्द पतलून जवळ होते. ते केवळ निवडक स्टोअरमध्ये विकले गेले.१९९१ मध्ये गोव्यात पहीले पॅटलून दुकान सुरू केले आणि १९९२ मध्ये शेयर मार्केटमधून पैसे जमवले आणि एक ब्रँड तयार केला. पण पैसे कमी पडू लागल्याने २०१२ साली हा व्यवसाय आदित्य बिर्ला ग्रुपला विकला. पॅटलून आणि बिग बाजारची सुरुवात कोलकातामधून झाली होती. २००१ साली बियानी यांनी संपूर्ण देशात बिग बाजार स्टोअर सुरू केले.

किशोर बियानी यांनी गेल्या अनेक वर्षांत सातत्याने कर्ज घेतले आहे. त्यामुळे फ्यूचर रिटेल 105 कोटी रुपये कर्जाचे व्याज परतफेड करू शकले नाही, त्यानंतर या कंपनीच्या डिफॉल्टचा धोका वाढला आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी फ्यूचर ग्रुपच्या लिस्टेड कंपन्यांचे कर्ज 12,778 कोटी रुपयांवर गेले होते, जे 31 मार्च 2019 पर्यंत 10,951 कोटी रुपये होते. काही थकीत देयके देण्यासाठी बियाणी यांच्याकडे मार्चपर्यंतची मुदत होती, पण रिझर्व्ह बँकेच्या बंदीने फ्यूचर समूहाला थोडा दिलासा दिला. फेब्रुवारी 2020 च्या मध्यावर, बियाणी यांची कर्जे फेडण्याची क्षमता नसल्याची बाजारात चर्चा होऊ लागली, त्यानंतर कंपनीच्या शेयरमध्ये जोरात घसरण सुरू झाली. यानंतर बियाणी यांच्याकडे कर्जदात्यांनी कर्जाच्या बदल्यात जास्त शेयर मागण्यास सुरवात केली. किशोर बियाणी यांनी त्यांचा रिटेल व्यवसाय सप्टेंबर २०२० मध्ये रिलायन्सला विकला.

रिलायन्स आणि फ्यूचर ग्रुपमध्ये झालेल्या या कराराची अनेक दिवस चर्चा सुरू होती. हा व्यवहार झाल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरूच आहे. पण बियाणी आणि अंबानी यांच्यात झालेल्या या व्यवहारातील एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोघांच्यात झालेल्या करातानुसार किशोर बियाणी आता पुढील १५ वर्ष रिटेल व्यवसाय करू शकणार नाहीत. किशोर बियाणी यांची एक कंपनी आहे ज्याचे नाव Praxis Retail असून ती होम रिटेलचा व्यवसाय करते. Home Town स्टोअर याच कंपनीचे उत्पादन आहे. बियाणी आणि कुटुंब या व्यवसाय करू शकते. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये होम टाऊनचा महसूल ७०२ कोटी रुपये इतका होता. रिलायन्स सोबतच्या व्यवहारात फ्यूचर ग्रुपने रिटेलमधील या कंपनीला मात्र विकले नाही. त्याचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..