मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ मा.जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी झाला.
जी. ए. नी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्लिश भाषाचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धिविन्मुख मानले जात. जी. ए. कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या. मराठीतील एक आघाडीचे नवकथालेखक म्हणून जी.ए. ओळखले जातात.
निरनिराळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्या कथेची मांडणी करण्याचा प्रयत्न करत. त्याचप्रमाणे मानवाला अगतिक व नगण्य बनविणार्यार नियतीला आणि तिच्या असीम शक्तीला जी.एं.नी आपल्या कथामधून बरेच प्राधान्य दिले असल्याचे आपणास पाहावयास मिळते.
जी.ए. कुलकर्णी यांच्या निळासावळा व रक्तचंदन या कथासंग्रहाना महाराष्ट्र शासनाचे साहित्यविषयक पुरस्कार मिळले होते. जी.ए. कुलकर्णी यांना ’काजळमाया’ या कादंबरीसाठी मिळालेला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, पुढे टीका झाल्यामुळे जी.एं.नी प्रवासखर्चासकट परत केला. त्यांची ग्रंथसपदा: निळासावळा, पारवा, हिरवे रावे, काजळमाया, रक्तचंदन इत्यादी कथासंग्रह.
जी. ए. कुलकर्णी यांचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply