नवीन लेखन...

गाथा यशाची, वैभववाडीतील सुपुत्राची…!

नक्की वाचा..! श्री. महेश संसारे यांची कृषी क्षेत्रातील प्रेरणादायी कहाणी. सर्व होतकरू तरुणांनी आदर्श घ्यावा असा थक्क करायला लावणारा प्रवास..!


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावचे सुपुत्र श्री महेश संसारे यांच्या यशाची गाथा आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन कृषिक्षेत्राला प्रदान केले.

आपला हिंदुस्थान, हिंदू संस्कृती गायीला गोमाता मानणारी, ३३ कोटी देवांचे स्थान कुठे आहे तर ते गायीत आहे ही आपल्या हिंदु संस्कृतीची शिकवण.. पण दुर्भाग्य असे की गोवंश आता हळूहळू नाहीसा होत चालला. आधुनिक शेतीकडे वळलेला शेतकरी गाय, बैल यांना ओझं समजू लागला. पण याच गोवंशापासून चांगला आर्थिक नफा होऊ शकतो ही बाजूच विसरून गेला.

या संकल्पनेला छेद दिला तो महेश संसारे यांनी. सुरवातीला नर्सरी ऊस लागवड, भातशेती आणि बांधकाम क्षेत्रात काम करणारे महेशजी गोपालनाकडे वळले. कॄषिक्षेत्रात प्रगती करण्याचे स्वप्न शालेय वयापासुनच होते. भुईबावडा येथे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करुन, पुढे लांजा येथे एग्रीकल्चर डिप्लोमा ( Agriculture Diploma) पूर्ण केला. गोपालनाकडे विशेष लक्ष वेधल्याने सांगलीला जावून पंचगव्य विषयी प्रशिक्षण घेतले. गोपालन आणि त्याचे फायदे आणि औषधी महत्व जाणून घेतले. आणि master diploma in panchgavya हा कोर्स पूर्ण करून चेन्नई येथे परीक्षा दिली व गव्यसिद्ध ( M.D. Panchgavya AM) ही पदवी मिळवली .

सुवर्ण कोकणचे शिलेदार “सतीश जागुस्टे” यांचे महत्वपुर्ण आर्थिक योगदान त्यांना लाभले. प्रत्येक व्यावसायिकाला प्रोत्साहन आणि मार्गदर्शनाची गरज असते. सतीश जागूस्टे यांच्या साथीने देसी गाईच संगोपन करायचे आणि त्यातून समाजसेवा करायची असा निश्चय मनाशी केला आणि गुजरातमधुन गीर आणि कोंक्रेज जातीच्या गायी त्यांनी आणल्या. आज ४० गोवंश त्यांच्या ताफ्यात सामील आहेत.

गीर जातीच्या गायी १७४६ कि. ग्रॅ. प्रति वेत एवढे दूध देतात. तर कोंक्रेज जातीच्या गायी १३३३ कि. ग्रॅ. प्रती वेत दूध देतात. दुधाचा दर हा ७० रुपये प्रतिलिटर आहे. शिवाय प्रतिदिन ५ ते ६ लिटर गोमुत्र या गायीपासून मिळते त्याचा बाजार भाव ५० ते ६० रुपये लिटर असून त्यावर प्रक्रिया केल्यास ३००/- ते ४००/- रुपये लिटर दराने गोमूत्राची विक्री होते. यातून चांगला आर्थिक नफा त्यांना मिळत आहे.

गायीपासून अनेक उत्पादने तयार करता येतात. देशी गायीचं शुद्ध तूप ३०००/- रुपये प्रतिकिलोने विकले जाते. विविध् प्रकारचे गोमूत्रअर्क, तुप, दही, ताक, शेण, सेंद्रिय खत अशा प्रकारची विविध उत्पादने घेतली जातात. वैभववाडीच्या या कृषिपुत्राची दखल Zee 24 Taas यावृत्त वाहीनीनेही घेतली. “सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे ” या सदरात २० मिनिटांची “विशेष मुलाखत” त्यांनी प्रसिद्ध केली होती.

वैभववाडी तालुक्याचे हे सुपुत्र पंचगव्य तज्ञ आहेत. त्यांना “गव्यसिद्ध” या नावानेही ओळखले जाते. पंचगव्य औषधे बनवण्याची कला त्यांना अवगत आहे. तसेच पंचगव्यात एकूण ४२ प्रकारची उत्पादने घेत आहेत गायीच्या गोमूत्रापासून अनेक प्रकारची औषधे बनवता येतात. यांचा लाभ सामान्य माणसाला व्हावा. समाजाला व्हावा म्हणून ते विशेष मेहनत घेतात हीच समाजसेवेची आवड म्हणून शालेय विद्यार्थ्यांना तसेच धार्मिक कार्यक्रमात ताक वाटप ही करतात.

गोपालनासोबत त्यांनी सेंद्रिय शेतीवरही विशेष लक्ष दिलेय. ऊस, हळद, मिरची, काजू, शेवगा यांची लागवड केली आहे. भविष्यात वैभववाडी तालुक्यात एक कृषि पर्यटन केंद्र उभारण्याचे महेश संसारे यांचे स्वप्न आहे. प्रत्येक कृषीमित्राने त्यांनी केलेल्या प्रकल्पाला भेट देणे गरजेचे आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषीक्षेत्रात सक्रिय होऊन आपल्यासारखी शेती करावी. गोपालनाचे महत्व व आर्थिक गणित जाणून घ्यावे. यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत.

महेश संसारे यांची कृषिक्षेत्रातील कामगिरी आपल्या सर्वांसाठी खुपच प्रेरणादायी आहे. कृषिक्षेत्राकडे तरुणांनी फिरवलेली पाठ आणि त्यातून होणारे नुकसान कधीच न भरून निघणारे आहे. हल्ली गुरांचे गोठे रिकामी झाले, सारवण्यासाठी शेण मिळताना मुश्किल, गायीला नैवेद्य घ्यायचाय तर कोणाच्या घरी गायी आहेत हा प्रश्न प्रथम पडतो. तर गोपालनाचे महत्व जाणा. महेशजींच्या गोशाळेला भेट द्या. गोशाला व्यवस्थापनाचा अभ्यास करा. महेश संसारे यांची मदत घ्या.

संपूर्ण सिंधुदुर्ग तसेच वैभववाडी तालुका ” सुजलाम् सुफलाम् वैभवशाली बनवा..” हीच या लेखाप्रति भावना. त्यासाठीच ही लेखनचा प्रपंच..धन्यवाद..!

मुलाखत पाहण्यासाठी लिंक –
https://youtu.be/Nu0K6hN6bvo

– गणेश उर्फ अभिजित

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..