गायिका गाऊ लागे ,
शास्त्रीय गान ते “सुस्वर”,
रसिकश्रोते स्तंभित,
लुब्ध” होती गानावर,
नाद ताल स्वर ,
आलापी अंतरे मुखडे,
रसिकांच्या दुनियेत,
रोमांच “अंगावर खडे,
स्वरा–स्वरांचे तरंग,
काळजाला हात घालती,
स्वर्गीय सुरांची पकड,
सगळेच तिला वश होती,
संगीताची दुनियाच न्यारी,
रसिकांना “खिळवून” ठेवे,
ब्रह्मानंदी लागता टाळी
बुडणे त्या स्वरसमुद्री,
परमानंद”” देई संगीत,
दुःखे सगळी विसरती,
अशा गानकलेने केवळ,
मुक्त”” आनंदही लुटती,
स्वरांची दुनिया वेगळी,
या दुनियेची “सर” नाही,
त्या दुनियेत पोहोचणे,
इतुके कठीणही नाही,
ताण ऐहिक जीवनी ,
काळज्या आणखी चिंता,
पदोपदी लागते निभावावे,
अगदी कठोर व्यवहारा,
संगीताचे जग निराळे,
कान देऊनी ऐकावे,
असंख्य प्रकार संगीताचे,
भान हरपून जावे,
वरवरचे सुख नसते,
आत्माही होई शांत,
परमात्म्याशी पोहोचणे,
नसावी कुठली “भ्रांत”,–!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply