गडगडाट नभी सारखा
काय हेतू आधी पारखा
न सोडावा खडा बारका
परकेपण येती!!
अर्थ–
आवाज चढला किंवा बोलण्याचा बाज बदलला की समोरचा व्यक्ती त्याच्या वर वीज कडाडल्या प्रमाणे बोलू लागतो. पण राग ही एक शरीरातील महत्वाची भावना आहे आणि ती व्यक्त होणे फार महत्वाचे असते हेही समजून घेणे महत्वाचे.
व्यक्ती तितुक्या प्रकृती हे अगदी खरं असतं. कोणाचा स्वभावच शांत, तर कोणाचा स्वभाव चिडका, बोलका, आरडाओरडा करण्याचा. काही लोकं मनाला काही पटले नाही तर शब्दांचा गडगडाट करतात तर काही नुसतेच आपलं म्हणणं समोरच्या व्यक्तीला पटवण्यासाठी. काहींना समोरच्याला एखादी गोष्ट सांगताना मुद्दाम जोरात बोलायची सवय असते जेणेकरून तो काही न बोलता ते मान्य करतो.
पण हे सगळं होताना समोरचा ही जर तसाच असला तर मात्र आकाशात विजा आणि ढग फुटी एकत्र झालीच समजावी. अशा वेळी एकाने वाऱ्यासारखे असणे गरजेचे आहे. म्हणजेच नुसते ऐकावे आणि वाहून जावे जेणेकरून समोरचा शांत होण्यास मदत होते. कारण शूल्लक कारणांवरून कडाक्याचे युद्ध होऊन पुढे माणसा माणसात भिंती उभ्या राहिलेल्या आपण पाहिल्या आहेत. तेव्हा खडा न टाकता तेथे खडे होणे जास्त महत्वाचे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply