…… भारतीय रेल्वे हे प्रवासाचे फार मोठे साधन आहे यामध्ये मालवाहतूक विशेष प्रमाणात केली जाते. भारतीय रेल्वे मध्ये अनेक लोकांना काम मिळाले आहे हे नाकारता येत नाही. रेल्वेतील लोकांचा प्रवास सुखमय होण्यासाठी रेल्वेने फार मोठे पाऊल उचलले आहे. रेल्वेने अनेक कामगारांचे संसार चालविली आहे त रेल्वे कर्मचाऱ्याला कमी भाड्यामध्ये खोली पाणी वर लाईट याची चांगली सुविद्या निर्माण करून दिलीआहे. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना ड्युटी ड्रेस पावसाळ्यात गम बूट हिवाळ्यात गरम कोट. इतकंच नव्हे तर रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला फ्री पास वर्षातून एकदा बोनस व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शाळेसाठी फि रेल्वे देते. इतकी सुविद्या रेल्वे कर्मचाऱ्यासाठी रेल्वे करते रेल्वे ही रेल्वे कर्मचाऱ्यांची आई व बाप आहे हे नाकारता येत नाही. इंडियन रेल्वे मध्ये 1978 पासून काम करतोय रेल्वे बद्दल मला पुष्कळ अभिमान आहे. रेल्वे माझे मायबाप आहेत रेल्वेमध्ये काम करीत असताना अनेक प्रसंग घडत असतात. काही वेळा विनोदी प्रसंग घडतात तर काही वेळा गंभीर विषय पुढे येतात..।
… मी 1985 साली कराड रेल्वे स्टेशनला काम करीत होतो ट्राफिक मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षातून एकदा डोळ्याची परीक्षा असते. या परीक्षेला मेडिकल असे म्हटले जाते. 1985 ला मी कराड रेल्वे स्टेशन मधून स्टेशन मास्टर डीएम कांबळे यांनी मिरजेला मेडिकल साठी पाठवले होते. मी त्यादिवशी दिवस पाळी करून मास्तर कडून मेडिकल में मो घेतला मास्तर मला म्हणाले उद्या तू महालक्ष्मी गाडीला मेडिकल ला मिरजेला जा. मास्टर यांच्याकडून मी मेडिकल मेमो घेतला आणि रेल्वे कॉटर्स मध्ये गेलो. त्यावेळी महालक्ष्मी चार वाजून पंचावन्न मिनिटांनी पहाटे येत होती. पण त्या दिवशी माझी गडबड झाली मी फार उशिरा उठल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी कराड रेल्वे स्टेशनवर येऊन उभी राहिली होती…।
… मी गडबडीत पायात चप्पल घातले आणि गडबडीत गाडीत बसलो. डबा नंबर एस सेवन या डब्यात मी बसलो आणि थोड्याच वेळात गाडी चालू झाली याच डब्यामध्ये दोन स्त्रिया जाग्या होत्या. मी मी बाकाच्या एका बाजूला बसलो होतो या दोन बायका हसत होत्या व काय बोलत होत्या हे मला ऐका य येत नव्हते. गाडी पुढे पुढे जात होती त्या दोन बायका माझ्या पायाकडे पाहत होत्या. एक्सप्रेस गाडी सांगली स्टेशनवर थांबली त्यातील एक बाई मला म्हणाली तुम्हाला कुठे जायचे आहे मी म्हणालो मिरजेला ती बाई म्हणाली तुम्ही काय करता मी म्हणालो मी रेल्वेत कामाला आहे…।
… मी त्या बाईला म्हणालो तुम्ही का हसता ती बाई म्हणाली तुमच्या पाया कडे बघा. मी पायाकडे पाहिले माझ्या उजव्या पायात माझ चप्पल होत व दुसऱ्या पायात एक स्लीपर होते. मी मनात खजील झालो या बाईंना काय उत्तर द्यावे हे मला समजेना. महालक्ष्मी एक्सप्रेस कराड सुटल्यापासून या बायका माझ्या पायाकडे पाहत होते आणि हसत होत्या. या बायकांच्या कडे माझे लक्ष नव्हते पण गाडी सांगली त आल्यानंतर माझ्या लक्षात आले मी गडबडीत आलो आहे. आणि माझे मन म्हणू लागले ही गडबड माझ्या महागात पडली. महालक्ष्मी एक्सप्रेस मिरज स्टेशन वर थांबली मी दोन्ही चप्पल पिशवीत घातले. व दुसरे 2 नवीन चप्पल नवीन घ्यायचे ठरविले सका सकाळी दुकाने उघडी नव्हती फक्त चहाची दुकाने उघडी होती. रोड वरील दुकाने दहानंतर उघडतात हे माझ्या लक्षात आले मी अनवाणी रेल्वे दवाखान्यात गेलो माझी मेडिकल झाली. थोड्यावेळात मला सर्टिफिकेट मिळा लि तोपर्यंत कोयना एक्सप्रेस मिरज स्टेशन वरून गेली होती. मी चप्पल च्या दुकानात जाऊन दोन नवीन चप्पल घेतले पायात घातले आणि नागपूर एक्सप्रेस ला कराड ला आलो. मी घरी बायकोला म्हणालो मला गडबड महागात पडली एका पायात माझ चप्पल व दुसऱ्या पायात स्लीपर गडबड झाली. माझी बायको म्हणाली अहो तुम्ही उशिरा उठल्यामुळे ही गडबड झाली आहे. पण मी बायकोला म्हणालो तू स्लीपर माझ्या पायतानाजवळ कसे ठेवले बायको म्हणाली त्यावेळी लाईट गेले होते म्हणून हा प्रकार घडला. अगं मी नवीन चप्पल घेतल कातर डब्यातील दोन बायका माझ्या पायाकडे पाहून हसत होत्या. हे पाहून बायको म्हणाली तुमची गडबड आणि गेली लाईट यामुळे असे घडले असू असू दे तुम्हाला तरी नवीन चप्पल मिळाले यात मला आनंद आहे..। पण माझी गडबड महागात पडली हे सारे लाईट गेल्यामुळे घडले हे माझ्या लक्षात आले धन्यवाद..।
–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.
Leave a Reply