नवीन लेखन...

गद्रे मरीनचे उद्योगपती दीपक गद्रे

रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील गद्रे मरीनचे उद्योगपती दीपक गद्रे यांचा जन्म १७ ऑक्टोबर रोजी झाला.

संगमेश्वर मध्ये राहणाऱ्या पण मुंबईतील सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दीपक गद्रे यांनी स्वतःला आपल्या गावी राहून व्यवसाय करायचा आहे, हे पक्के ठरविले होते. पिठीजात किराणामालाचा व्यवसाय हे त्यामागचे आणि एक कारण. कॉलेजच्या सुटीत ते गावी जाऊन वडिलांच्या किराणा व्यवसायात नवे काहीतरी शिकत. मात्र, बीकॉम झाल्यानंतर त्यांची मन अन्य व्यवसायांच्या वाटा शोधू लागले. कोकणात आई-वडिलांजवळ राहून एखादा चांगला व्यवसाय करता येऊ शकतो का, याचा शोध घेत असताना, कोकणात मिळणारे मुबलक मासे त्यांना खुणावू लागले. पुढे हा मत्स्य अवतार यावर त्यांचे उद्योगसाम्राज्य उभे राहिले.

मत्स्य विक्री व्यवसायाचा काही अनुभव असल्याने त्यांनी मुंबईच्या फिश प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यावेळी टाटा ऑइल मिल्सचा फिशिंग विभाग रत्नागिरीतून ट्रक मधून कोळंबी मुंबईला प्रक्रिया करण्यासाठी घेऊन जात असे, दीपक गद्रे यांनी त्यांना रत्नागिरीतच ‘फिनिश प्रॉडक्ट’ बनवून देतो, असे सांगितले आणि गद्य यांचा या व्यवसायात शिरकाव झाला. पाच वर्षाच्या अनुभवाने त्यांना मोठी उडी मारण्याचा आत्मविश्वास दिला. त्याच वेऴी सरकारच्या पदवीधर बेरोजगार योजना त्यांना एमएसएफसी व सीकॉम अंतर्गत कारखाना काढण्यासाठी कर्ज मिळाले, बॅका व अन्य व्यापार्यांच्या साह्यातून २५ लाख रुपयाचे कर्ज त्यांनी सुरुवातीस काढले काही रक्कम मच्छीमाराना दिली, मात्र बरेचसे पैसे अडकले.
आणि हे कर्ज पोहोचले तब्बल ६० लाखांवर तरी त्यांनी निग्रहाने व्यवसाय सुरू ठेवला.

चीनमध्ये रिबनफिशला खूप मागणी असल्याचे कळल्यानंतर त्यांनी या माशांच्या निर्यातीस सुरुवात केली. जाळ्यातुन कोळंबी सोबत येणारे पण टाकाऊ असणाऱ्या या माशांना परदेशी बाजारपेठ मिळाली. माशांची निर्यात सुरू असतानाच त्यांना ‘सुरिमी’ गवसली. जपानी लोक माशांच्या पांढऱ्या रंगाच्या मांसापासून बनलेली ‘सुरिमी’ वापरतात. ही ‘सुरिमी म्हणजे आपल्याकडची तिंबलेली कणिक, जपानमध्ये हजारांहून अधिक पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरिमीची बाजारपेठ ओळखून त्यांनी १९९४ मध्ये भारतातला पहिला सुरिमी बनविण्याचा कारखाना उभारला. पूर्वी केवळ माशाचा ३० ते ३५ टक्के भाग वापरला जायचा. मात्र, आता माशाचा १०० टक्के भाग वापरला जातो. त्यामुळे, मत्स्यव्यवसायाला अमर्याद वाव आहे, असे गद्रे सांगतात.

आता माशांचे मांसच नव्हे तर माशांची त्वचा, खवले आणि काड्यांपासून सौंदर्यप्रसाधने व सौंदर्यवर्धक औषधे बनतात. ‘गद्रे मरीन’मध्ये माशांच्या निर्यातीत कोळंबी शेती तसेच कोळंबी प्रक्रिया केली जाते. शिवाय त्यांनी बनवलेल्या माशांच्या विविध खाद्यपदार्यांच्या निर्यातीचा आकडा २५ हजार टनापर्यंत पोहचला आहे. त्यांची वार्षिक उलाढाल आहे ४२५ कोटी. गद्रे ब्रॅडने आता देशभर मेट्रोसिटीमध्ये ‘रेडी टू कूक अ‍ॅण्ड रेडी टू इट’ खाद्यपदार्थ दाखल केले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात माशांवर प्रक्रिया करण्यासाठी वापरलेल्या पाण्यापासून इंधनही बनवले जाते. त्यातून निघालेल्या मिथेन वायूचा उपयोग बॉयलरमध्ये इंधन म्हणून केला जातो. शिवाय, माशांच्या अन्न टाकाऊ उद्यापासून उत्तम खत बनवले जाते.

त्यांचे सुपुत्र आणि गद्रे मरीनचे M.D. अर्जुन गद्रे यांनी १९९९ साली या व्यवसायात पदार्पण केल्यानंतर कंपनीने मत्स्यउद्योगात भारतातर्फे ‘न भूतो..’ अशी कामगिरी केली. १९९९ पासून ‘गद्रे’ हेच भारतातर्फे मत्स्यपदार्थ निर्यातीत ‘ट्रस्टेड ब्रँड’ आहेत. २००९ पासून सलग चार वर्षे बेस्ट एक्स्पोर्ट परफॉर्मन्स, HACCP सर्टिफिकेट, BRC सह विविध आंतरराष्ट्रीय सन्मान गद्रे मरीनने मिळवले आहेत.

सध्या गद्रे मरीनचे विविध प्रोडक्टस चीन, जपान, द कोरिया, मलेशिया, तैवान, ऑस्ट्रेलिया सह विविध देशात निर्यात होतात. रत्नागिरीतल्या गद्रे मरीन च्या कारखान्यातून सुमारे दीड हजार तरुणांना रोजगार मिळालाय. पहिल्यांदाच कोकणी चवदार मसाल्यांसह रेडी टू कूक मत्स्यपदार्थ बनविणाऱ्या गद्रे कंपनीने ‘फ्रोझन (फिश) फूड्स’ क्षेत्रात अभूतपूर्व, आनंददायी आणि अल्पावधीत फार मोठी झेप घेण्याची अविश्वसनीय कामगिरी केली आहे. क्रॅब स्टिक्स, मसाला बांगडा, मसाला प्रॉन्स, फ्लेवर्ड फिशसह शेकडो मत्स्योत्पादने देशविदेशात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवीत आहेत.

केवळ व्यवसायिक यश हेच अंतिम ध्येय समोर न ठेवता दिपक गद्रे यांनी खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य, विविध सामाजिक उपक्रमांना मदत, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांना सहाय्य केलं आहे, मात्र त्याची ‘बातमी’ केली नसल्याने हे ‘गुप्तदान’ सत्कारणी लागूनही प्रसिद्धीस पावले नाही. कला आणि क्रीडा क्षेत्रालाही दीपक गद्रे व अर्जुन गद्रे आणि एकूणच ‘गद्रे मरीन’ने मोलाची मदत केली आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..