नवीन लेखन...

गजानन महाराजांचे रत्नागिरीतील सुंदर मंदिर !

आपल्या हिंदू धर्मातील मंदिरे, मठ, तीर्थस्थाने याबद्दल अनेक दंतकथा, कथा, त्याबद्दलचे काही किस्से आपण ऐकतो. रत्नागिरी शहरापासून, पावस मार्गावर फक्त १२ कि.मी. अंतरावर, श्री संत गजानन महाराजांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराबद्दलही असेच काही आश्चर्यकारक व योगायोगाचे किस्से ऐकायला मिळतात.

सध्याच्या युगात प्रत्येक जण अनेक प्रश्न, संकटे आणि अडचणीने गांजलेला असतो. त्यावर बहुतेक सामान्य संसारी माणूस हा देवधर्मातून, भक्तीमार्गाने उपाय शोधत असतो. शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांचा भक्त परिवार देश विदेशात खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अलीकडे आपण खूप मोठमोठ्या श्रीमंत देवस्थानांमधील गैरप्रकारांबद्दल बातम्या वाचतो. पण गजानन महाराज यांच्या शेगाव येथील देवस्थानचे व्यवस्थापन, स्वच्छता, शिस्त, भक्तमंडळींच्या उत्तम व्यवस्थेची मात्र आपण खूप चांगली वर्णने ऐकतो. गजानन महाराजांच्या अन्यत्र असलेल्या मंदिरातही तीच शिस्त, स्वच्छता, पारदर्शकता, भक्तांची स्वयंशिस्त आढळून येते.

रत्नागिरी नजिकच्या गोळप या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर असेच अत्यंत प्रशस्त स्वच्छ आणि भव्य आहे. मंदिराच्या भोवती चारही बाजूंना पाण्याचे छोटे खंदक आहेत. हे मंदिर २०१६ मध्ये सुरू झाले. सकाळी ६ll ते रात्री ७ll पर्यंत हे मंदिर दर्शनार्थ खुले असते. गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद असतो.

मूळचे या गावातील आणि मुंबईतील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करणारे कै. वसंतराव गोगटे हे गजानन महाराजांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या मनात या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर बांधण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या येथील घरात जायला, कोकणातील खालची आळी, वरची आळी या रचनेप्रामाणे जेमतेम पायवाट होती. तरीही १९८६ मध्ये, शेगावची महाराजांची पालखी, हत्ती घोड्यांसह त्यांच्या घरी आली. आता महाराजच येथपर्यंत आले आहेत तर त्यांचे कायमस्वरूपी मंदिर येथे व्हायला हवे, असे त्यांना तीव्रपणे वाटू लागले. पण सर्व गोष्टी आणि याचे आर्थिक गणित जमवायचे कसे हा प्रश्न होता. या वसंतराव गोगटे यांना गजानन महाराजांच्या चरित्रावर निघालेल्या दूरदर्शन मालिकेमध्ये, साक्षात गजानन महाराजांचेच काम करण्याची सुसंधी लाभली. हाच गजानन महाराजांचा आदेश आहे, इच्छा आहे असे मानून त्यांनी त्यांना मिळालेले त्याचे सर्व मानधन या कामासाठी दिले व सुरुवात केली. या प्रचंड खर्चासाठी त्यांचा हा एक अत्यंत पवित्र असा हातभार होता. त्यांचे पुतणे श्री. माधव गोगटे हे आता या मंदिराची व्यवस्था पाहतात.

या मंदिराच्या प्रांगणात, गजानन महाराजांची, एक पाय खाली सोडून बसलेल्या सुप्रसिद्ध छबितील, एक प्रचंड म्हणजे सुमारे १८ फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. असे कळले की ही मूर्ती खरे तर माहिमच्या गजानन महाराजांच्या मंदिर परिसरात बसविण्यासाठी तयार करण्यात आली होती. पण तेथे कांहीं तांत्रिक कारणामुळे ते शक्य न झाल्याने, त्या मूर्तीचा स्थानापन्न होण्याचा योग मात्र या गोळपच्या मंदिरात होता हे खरे ! या मंदिरातील गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन तर अगदी हमरस्त्यावरून जातांना सुद्धा सहजपणे होते. मुख्य मंदिराशेजारी पठण, पारायण, कीर्तन, प्रवचन इत्यादींसाठी एक प्रशस्त सभागृह बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. श्री गजानन महाराजांचे जगभर पोचलेले, ‘श्री गजानन विजय ‘ हे चरित्र लिहिणारे दास गणू महाराज ( सहस्रबुद्धे) यांची मूळ वास्तू आणि विठ्ठल मंदिर रत्नागिरीनजिकच्या कोतवडे येथे आहे, हा सुद्धा एक योगच म्हणायचा ! इथली प्रसन्नता आणि पावित्र्य याचा अनुभव घेण्यासारखा आहे.

ll गण गण गणात बोते ll
( हा लेख आणि फोटो शेअर केल्यास कृपया नावासह शेअर करावेत )
– मकरंद करंदीकर.

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..