नवीन लेखन...

गजरा…

“हे घे गजरा,माळ तुझ्या केसात.”..मी माझ्या ‘so called Modern’समजणार्‍या मैत्रीणीला ‘offer’ केले..

“ओह..गजरा,No way,सुमेधा,its so old fashioned!!…इति माझी मैत्रीण..
तिचे हे उद्गार ऐकून मी २सेकंद तिच्याकडे टकामका पाहू लागले..

“काय झालं?वाईट वाटलं का तुला?”..माझ्या मैत्रीणीचे हे वाक्य ऐकून मला तिची किवच आली..मनात म्हणलं,वाईट कसलं वाटतयं,हसू येतयं..गजरा,old fashioned?म्हणे…आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या,चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत..

‘गजरा’ हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं ना!!सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे..गोवा,कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत. गजरा-सौंदर्य हा संबंध सर्वश्रुत आहेच.माझ्या मनात मात्र गजरा-आरोग्य याविषयी विचार सुरु झाले होते.

सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे.पण निसर्गात पाहिल तर ‘मोगरा,चाफा,बकुळ ‘ यांना बहर आला आहे.बघा,किती काळजी आहे निसर्गाला आपली.या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे.आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत.म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा, नाही का?कसा?तर सर्वात सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे.केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो.मन शांत करतो.अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच..

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते.दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या pituitary gland च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात.त्यावरच स्त्री चे आरोग्य अवलंबून असते.गजरा,किंवा फुलाच्या वास नाकाद्वारे जेव्हा घेतो,त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते,शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते.परिणामी स्त्रीयां मधील संतुलन रहाण्यास मदत होते.मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे.स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो..(म्हणून तर सिनेमातील नवरोबा बायको ला प्रेमाने गजरा माळताना दाखवतात)..शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण concentration,motor development करणाऱ्याच आहेत.परदेशातील बाक थेरपी,अरोमा थेरपी या काय आहेत?फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत.पण आपलं कसंय,’घर की मुर्गी…’भरगच्च पैसे देऊन अरोमा थेरपी घेऊ..पण गजरा माळून old fashioned होणार नाही..असो..

असे सगळे विचार मनात येत होते,तेवढ्यात मैत्रीण म्हणाली,”सुमेधा,चल catch u later…”
मी म्हटलं,”हो,गं Spa ला जायचं असेल ना तुला..”..

“OMG तुला कसं कळलं..so sweet of u,येतेस का तु पण?मस्त जोजोबा oil चा वास तो…wow”
“नको बाई,गजरा आहे माझ्याकडे मस्त वासाचा..”

ती काहीशी हसतं हसतं मला bye करुन निघून गेली..:)

वैद्य.सुमेधा रानडे.

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..