ह्याचा २० मीटर उंच वृक्ष असतो,बुंध्याची साल पांढरी व काण्ड त्वचा धुरकट असते.जुनी झाल्यावर साल फिकट रंगीत तुकड्यानी सुटते. पाने १०-२५ सेंमी लांब,८-२० सेंमी रूंद असून पर्ण वृन्त ५-१५ सेंमी लांब असतो.त्याच्या टोकाशी गाठी असतात.त्याची पाने देठा जवळ हृदयाकृती तर शेंड्या जवळ पातळ व टोकदार असतात.फुल तांबूस पिवळे एक फुट लांबीच्या मंजिरी स्वरूपात असते.ती अडुळशाच्या फुलांप्रमाणे दिसतात.फळ बकुळीच्या फळा सारखे अंडाकृती व पिवळ्या रंगाचे व गोड तुरट वासाचे असते.फळात १-२ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे मुळ व फळ.ह्याचे मुळचवीला कडू,तुरट,गोड असून उष्ण गुणाचे व जड असते.तर फळ चवीला गोड असून थंड गुणाचे व जड आणी स्निग्ध असते.ह्याचे मुळ वात कफ नाशक तर फळ वातपित्त नाशक असते.
चला आता गंभारीचे औषधी गुणधर्म पाहुयात:
१)गंभारीची पाने स्निग्ध व थंड असल्याने तापा मध्ये व डोके दुखीत त्यांचा लेप डोक्यावर करतात.
२)शरीरात पित्तवाढून तहान लागली असल्यास व शोष लागत असल्यास चंदन,वाळा व साखरे सह गंभारीच्या फळाचा फांट देतात.
३)गंभारीचे पिकलेले फळ थंड गुणाचे असल्याने रक्त व पित्तशामक असून रक्तपित्तात उपयुक्त आहे.
४)गंभारीचे फळ हे गर्भाशयास बल देते व गर्भपात होण्याचा धोका टळतो.
५)लघ्वीच्या त्रासामध्ये गंभारीच्या पानांचा रस गाईच्या दुध व साखरे सह देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply