२०२० साली सुरु झालेल्या कोविड महामारी मुळे अनेक क्षेत्रामधील व्यवहार हे पूर्णपणे बंद झाले. अनेक खेळाचे सामने व प्रशिक्षणसुद्धा काही काळ स्थब्ध झाले. सर्व काही बंद असल्यामुळे बऱ्याच जणांनी घरात बसून इंटरनेट द्बारे विविध गेम खेळण्यात रुची दाखविली. दरम्यान यामधे बऱ्याच जणांचे लक्ष वेधले ते बुद्धिबळ प्रशिक्षण व ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेने. दरम्यान जगभरातून १०० हून अधिक देशांनी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत व प्रशिक्षणात पसंती दर्शविली. यामुळे अनेक कपन्यांनी आपल्या गेमिंग डोमेन मधे बुद्धिबळाला प्राधान्य देत, निगडीत प्लॅटफॉर्म बनविण्यास सुरुवात केली व गेमिंग डोमेन हा विषय नवीन व कुतूहलाचा वाटू लागला.
बुद्धिबळाचा विचार करता बेसिक चेस सिस्टीम या बोर्ड रेप्रेसेनटेशन, मीन मॅक्स सर्चींग, स्टॅटिक बोर्ड इव्हॅल्यूएशन फंक्शन, जेनेटिक अल्गोरिथम्स या संकल्पना व अल्गोरिथम्स वर अवलंबून आहेत. तर बुद्धिबळाच्या स्पर्धेकरिता याव्यतिरिक्त ऍटोमॅटिक पेरिंग सिस्टीमचा उपयोग केला जातो. अद्यावत चेस सॉफटवेअर सिस्टममधे ऍडव्हान्स डेटा मायनिंग व आर्टीफिसिअल इंटेलिजन्स टूल्स चा वापर करून सदर सिस्टमस अधिक प्रभावी बनविण्यात आलेल्या आहेत.
सध्या अनेक इंटरनॅशनल चेस ट्रैनिंग्ज ऑरगॅनिझशन व कंपन्याद्वारा ट्रैनिंग्ज प्लॅटफॉर्म विकसित करून ते संकेतस्थळा वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामधे chess.com व lichess.org हे जगप्रसिद्ध संकेतस्थळ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
सद्या गेमिंग डोमेन ची वाढती क्रेज पाहता अनेक पदवीधर या क्षेत्रात करिअर करण्याकरिता उत्सुकता दर्शवित आहेत.
— रोहित पवार.
(Working with MNC)
Leave a Reply