गणपती……
कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान…
तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय….
अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो…प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता… तुमकाय मातीच होउचा हा… तेवा माजा नकात…. मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय…. हीच घराची मर्यादा…. हीच घराची शोभा… एकच सण वर्षाचो जो घरात मयत झाला तरी होताच…. आमचे जिवय तोचआणी देवय तोच..
पण तुम्ही मुंबयवाल्यानी तेचो निकाल केलाय….. गटारार … संडासच्या पाईपलायनीर…. गणपती बसवलास…. तेच्यानावान धंदो काडलास… सार्वजनिक गणपतिंचो….
आमच्या शास्त्रात एका देवाचे दोन मुर्ते एका जाग्यार नाय चलनत…. तर एक पुजेक आणी एक शोक …
आवशीच्या घोवान तरी देवाचो शो केल्लो काय रे?
गटारावरच्या देवाकडे कसला पावित्र येतला रे? थय देवाच्या नावार अक्रीतच कुदतला….. थय दारूच चलतली…… सोमा गोमा बाईच बघुक येतले….. मायझयानु घरात सोवळा लावच्या शिवाय पुजा करून दाखवा रे…. नाय बापाशीन तुमची उत्तरपूजा घातल्यान तर माका इचारा….
आजय मालवणी मुलखात सगऴ्यादेवांका टोपी लावतीत…. पण गणपतीच्या फुड्यात कोण खोटा बोलाचा नाय….
वर्षभर ऩचुकता घेणारेसुद्धा गणपती आसापर्यंत घेणत नाय….
तुमका मतांसाठी देवाचो बाजार मांडणार्यांका ह्या काय समाजतला….
मेल्यानु झपला तर पाळा रे तेचा सगळा…. पण टिंगल करू नको… मातयेचो देव तो… तेका प्लास्टर चो करून पूजू नकात…. मातयेची पूजा करा… तेनिच तुमचा भला जातला….
म्हातारो पोट तिडकीन बोला होतो … आणि समोरचे मुंबईकर सगऴे गायब झाले होते…
…
…
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
Leave a Reply