(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते. जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.)
उंबराच्या झाडाच्या गाण्याने
पहाटे जाग येते तेव्हा वाटते
जणू कोणी नर्तक
पायात बांधून घुंगरांचा साज
करतोय सुंदर पदन्यास
उंबराच्या झाडात म्हणे असतो
सद्गुरूंचा वावर
म्हणूनच काही चिमणी पाखरं
पहाटेच सुरू करतात
मधुर मंत्रजागर?
असेलही खरे
म्हणूनच म्हणतात का बरे?
चराचर सृष्टीतच
भरला आहे ईश्वर?
पहाटेच्या मंगल वेळी
गोड किलबिल मंजुळ वाणी
गाणारे झाड
अलौकिकाचा स्पर्श!
किमयागार तो
सृष्टीचा इश
जोडूनी दोन्ही कर
त्याला करू वंदन!
— विनायक अत्रे.
Leave a Reply