सखये अजुनही दरवळवतो
तुझ्या, प्रीतीचा गंध कस्तूरी….
रुतलेल्या तुझ्या पाऊलखुणा
मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी….
आजही तुझेच वेड लोचनांना
उमलुनी येती प्रीतभाव अंतरी….
सांगनां, यातुनी सावरावे कसे
मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी….
हे गुज, मनीचे मधुरम प्रीतीचे
व्याकुळलेले, केशरी सांजतीरी…
कालचक्र हे अखंडित अविरत
तशीच ओढ़, तुझीच गं निरंतरी….
–वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908 )
रचना क्र.२७५
२९/१०/२०२२
Leave a Reply