गंध व्हा, उधळा स्वतःला
फूल आधी व्हा तुम्ही
रंगवुनी ह्या जगाला
इंद्रधनुषी व्हा तुम्ही
उजळण्या हे विश्व सारे
उजळणारी ज्योत व्हा
ज्योत म्हणुनी मिरवताना
राख बनण्या सिध्द व्हा
विश्व सारे उजळताना
ज्योत जळते अंतरी
प्रेमपक्षी फुलवताना
चंद्र झुरतो अंबरी
व्हा प्रकाशी गा मनाशी
गीत व्हा विश्वातले
जीवनाचे व्हा प्रवासी
शब्द व्हा गीतातले
कोवळे ऊन व्हा
अन् बरसणारा मेघ व्हा
घन तमाला छेदणारी
ती विजेची रेघ व्हा
– हेमंत बर्वे
Leave a Reply