मी पूर्वी पुण्यात सणसवाडीला ज्या कंपनीत काम करायचो तिथे पाटील नावाचे अकौंट्स मैनेजर आमच्याबरोबर होते. कंपनीच्या तवेरा मधून येता जाता गाडीत गाणी सुरु असायची. तेंव्हा रेडिओ मिर्ची आणि विविधभारती ही दोनच एफ एम रेडिओवर वाजायची. असेच कधीतरी अचानक मुकेशजीं चे गाणे लागायचे आणि ते चटकन आम्हाला म्हणायचे ‘अरे ऐका गाणं…साक्षात गंधर्व गातोय’.
किशोर आणि रफीचा कट्टर चाहता असलेला मी, मुकेशजींच्या गायकीची खरी ओळख व्हायला मला बराच उशीर झाला. पण एकदा या गंधर्वाने गायलेल्या गाण्यांशी तुमच्या हृदयाशी गाठ बसली की मग ती गाठ जन्मभर सुटणार नाही हे नक्की. माझेही अगदी तेच झाले.
मुकेशने आपल्याला काय दिले असे कोणी मला विचारले तर क्षणाचाही विचार न करता एकाच शब्दात मी म्हणेन ‘दर्द’.
हो दर्द..!
मुकेश यांनी गायलेली भाव विभोर, करुण व दर्दभरी गाणी म्हणजे भग्न हृदयी प्रेमीकांना आपल्या दुख-या, भळभळणा-या जखमेवर लावण्याचे मलमच होय.
‘पहली नजर’ या आपल्या पहिल्याच सिनेमात ‘दिल जलता है तो जलने दे’ हे दर्दभरे गाणे मुकेश यांनी असे गायले की साक्षात के.एल. सैगलना देखिल प्रश्न पाडला ‘अरे, हा आवाज तर अगदी माझ्यासारखा आहे..पण मी हे गाणे कधी गायले?’ असे नाही की मुकेश साहेबांनी रोमँटीक, उडती गाणी गायली नाहीत. त्यांचे ‘चांद सी महबूबा हो मेरी कब, ऐसा मैने सोचा था’ हे हिमालय की गोद मे मधील रोमँटीक गाणे माझ्या वैयक्तिक टॉप टेन लिस्ट मधे आहे. पण तरीही मला मुकेश साहेबांची दर्दभरी गाणीच हृदयाच्या जास्त जवळची वाटतात.
मला आवडणारी ही त्यांची काही दर्दभरी गाणी..
१. आ लौट के आजा मेरे मित
तुझे मेरे गीत बुलाते है.. (फिल्म- राणी रुपमती)
२. ये मेरा दिवानापण है या महोबत का सुरुर
तू न पहचाने तो है ये तेरी नजरोंका कसूर (फिल्म-यहुदी)
३. जिस दिल मे बसा था प्यार तेरा
उस दिल को कभी का तोड दिया (फिल्म-सहेली)
४. सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी
सच है दुनियावालो के हम है अनाडी (अनाडी)
५. कोई जब तुम्हारा हृदय तोड दे
तडपता हुए गर कोई छोड दे (फिल्म-पूरब और पश्चीम)
६. जुबांपे दर्द भरी दास्तान चली आयी..
बहार आनेसे पहले फिजा चली आयी..(फिल्म-मर्यादा)
७. कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये.. (फिल्म-आनंद)
८. किसी राहमे किसी मोडपर
कहीं चल न दे मुझे छोडकर
(लताबरोबर डुएट. फिल्म-मेरे हमसफर)
९. चल अकेला, चल अकेला, चल अकेला
तेरा मेला पिछे छुटा राही, चल अकेला (फिल्म- संबंध)
१०. दुनिया बनानेवाले, क्या तेरे मनमे समाई,
काहेको दुनिया बनाई..(तिसरी कसम)
११. दोस्त दोस्त ना रहा..
प्यार प्यार ना रहा.. (फिल्म -संगम)
१२. वक्त करता जो वफा आप हमारे होते
हम भी औरोंकी तरह आपको प्यारे होते (फिल्म-दिल ने पुकारा)
१३. मै तो इक ख्वाब हूं..इस ख्वाबसे तू प्यार ना कर
प्यार हो जाये तो फिर प्यार का इजहार ना कर
(फिल्म- हिमालय की गोद मे)
१४. तेरी याद दिलसे भुलाने चला हूं..
मै खुद अपनी हस्ती मिटाने चला हूं..(फिल्म- हरियाली और रास्ता)
१५. भूली हुई यादो, मुझे इतना ना सताओ..
अब चैनसे रहने दो, मेरे पास ना आओ..(फिल्म-संजोग)
ह्या पंधरा गाण्यां व्यतिरीक्त देखील अनेक सुंदर दर्दभरी गाणी या गंधर्वाने आपल्या अल्पायुषी कारकिर्दीत गायली.
होय, ५३ वर्ष हे काही त्यांच्या जाण्याचे वय होते का?
खरंच नाही.
पण या गंधर्वाने आपल्या सच्च्या सुरांनी सजवलेला ही अजरामर गाणी आपल्यासाठी मागे ठेवली आहेत.
आपण पामर..काय करु शकतो..?
फक्त एवढच…
मुकेशची गाणी कानावर पडली की सर्व काम सोडून ते कोमल, सच्चे सूर कानात साठवत रहायचं आणि म्हणायच..
‘अहाहा..साक्षात गंधर्व गातोय..!!’
-सुनिल_गोबुरे
Leave a Reply