नवीन लेखन...

गंगा दशहरा

जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे. मला आठवते माझ्या लहानपणी दांपत्याला घरी आमरसाचे जेवण करण्यासाठी बोलावले जात होते. आणि जातांना त्यांना आंबे.दक्षिणा गहू. एका ताटात तर सवाष्णीला खणानारळाने ओटी भरली जायची. मी आजही हे करते. हा उत्सव दहा दिवस करतात. आता बाकीचे काही जमत नाही म्हणून फक्त आंबे. गहू व दक्षिणा देते…
मान्सून आल्यावर नर्मदा नदीला साडी घालण्याचा एक मोठा कार्यक्रम असतो असे ऐकले आहे. तसेही कोळी समाज नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करतात. कदाचित या मागील उद्देश हाच असेल की जलदेवता प्रसन्न असावी. तिने जीवनदायी असावे. शेतीच नव्हे तर सगळ्या सृष्टीचीच ती जीवन फुलवणारी आहे. पावसाच्या चार थेंबानी देखिल किती सुखावतो आपण. किती आतुरतेने वाट पाहत असतो. सगळीकडे आंनद असतो. म्हणूनच बालकवींना हिरवे हिरवे गार गालीचे.. हे काव्य सुचले असावे. पण हीच जलदेवता जेव्हा कोपिष्ट होते तेव्हा काय होते हे सगळे जाणतात. त्यामुळे तिची पुजा. फळदान. साडी किंवा खणानारळाने ओटी भरणे हे सगळे केले जात असावे…
आज परिस्थिती अशी आहे की आपण कुणाला घरी बोलावू शकत नाहीत. आणि इतर बाबींचा समावेश करु शकत नाहीत. त्यामुळे काळानुसार आपण ही प्रथा जर गरजूंना देउन पुढे चालवू शकतो. दिल्या शिवाय घ्यायचे नाही ही आपली संस्कृती आहे. कारण या बदल्यात आपल्याला आशीर्वाद दिला जातो. जेष्ठत्वाच्या नात्याने म्हणूनच जेष्ठ महिन्याची सुरुवात गंगादशहरा याने सुरू होत असावी.
जय गंगे भागिरथी. हर हर नर्मदा मैय्या
धन्यवाद
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..