नवीन लेखन...

गनीमीकावा….

अफजल खानाचा विनाश अटळ होता. दोन महिन्याचं सुयोग्य नियोजन होत मोहिमेमागे. खानाने जेव्हा वाई सोडली तेव्हाच तो त्याच्या विनाशाकडे वाटचाल करू लागला. राजापूर पासून प्रतापगड पर्यंत सैन्य महाराजांनी पेरून ठेवले होते. जवळीतून बाहेर पडणाऱ्या सर्व वाटा रोखून धरल्या होत्या. खान आणि त्याचे सैन्य कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाही अशी व्यवस्था महाराजांनी करून ठेवली होती. अगदी खानाला मारल्यानंतर पुढील 20 दिवसांचे नियोजन देखील तयार होते.

निवृत्त कर्नल पासलकर आपल्या shivaji -the great guerrilla या पुस्तकात प्रतापगडच्या लढाईचे सविस्तर वर्णन करताना लिहितात कि “हि लढाई म्हणजे गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. भारतीय सैन्य दलात आजही हि लढाई , नियोजन शिकवली जाते.”

तलवारी बरोबरच बुद्धीचा आणि सर्वात महत्वाचे भूगोलाचा सुयोग्य वापर कुणी केला असेल तर तो महाराजांनी. आपण निवडलेल्या रणक्षेत्रात शत्रूला यायला भाग पाडणे यातच अर्धी लढाई जिंकली महाराजांनी. शत्रूला गाफील ठेऊन आपल्या व्यूहरचनेत अलगद अडकावणे फार कठीण.

खान कुणी सामान्य मनुष्य न्हवता, औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना त्याला पराजित करणारा अफझल एक पराक्रमी योद्धा होता. त्यामुळे त्याला पराजित करणे हा महाराजांचा फार मोठा विजय होता. खानाच्या पराजयाने महाराजांच्या नावाचा डंका समस्त हिंदुस्तानात पोचला. दिल्लीची पातशाही देखील हादरून गेली.
10 नोव्हेंबर रोजी खानाचा मुडदा पडताच महाराज स्वस्थ बसले नाहीत. खानाच्या मृत्यूची बातमी पोचून आदिलशाही जागी होण्या आधी महाराजांनी आदिलशाहीचा कोल्हापूर पन्हाळा पर्यंतचा प्रदेश मारला. 10 नोव्हेंबर ला खानाच्या मृत्यूला सुरु झालेला हा संघर्ष 28 नोव्हेंबर पर्यंत आदिलशाही मुलुखात मराठ्यांचा विजयी भगवा फडकावून थांबला.

प्रतापगडाचे युद्ध … हे गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..