नवीन लेखन...

गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!

गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात.

पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत असतातच ! पण आपल्या गणपतीच्या आरत्या हा सुद्धा आता धार्मिक कार्यक्रम राहिलेला नसून तो आता एक Reality show किंवा Performing show होत चालला आहे.आपण कुठल्या आरत्या म्हणतोय, काय शब्द म्हणतोय, चाल कुठली लावली आहे अशा गोष्टींकडे लक्ष न देता केवळ एक उपचार म्हणून तो दणक्यात पाळला जातो.

आपल्या विविध संतांनी रचलेल्या, शेकडो वर्षे जुन्या आरत्यांना ( मग त्यात “शेंदूरलाल चढायो अच्छा गजमुखको ” ही हिंदी आरतीही आली) त्या संतांच्या अपार भक्तीची पार्श्वभूमी लाभली आहे. काही मराठी आरत्या आणि गणपती पूजेनंतर “गणपती बाप्पा मोरया ” हा मराठीतला जयजयकार तर अगदी अमेरिकन, ब्रिटीश, जपानी, कोरियन मंडळीही ( तेथे स्थाईक मराठी किंवा भारतीय मंडळी नव्हेत ) मराठीतूनच करताना ( युट्युबवर) पाहायला मिळतात .

पण आपल्याला मात्र त्या आरत्या आता जुन्या, कालबाह्य , out of fashion वाटायला लागल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांना संत कवींच्या या आरत्यांऐवजी … देवा हो देवा गणपती देवा, जय गणेश, जय गणेश, जय गणेशदेवा, देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा ,ओम जय जगदीश हरे …. अशी व्यावसायिक गीतकारांनी रचलेली सिनेमातील गाणी ह्याच आरत्या वाटायला लागल्या आहेत.

येई गे विठ्ठले माझे माउली ये आणि आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रम्ह या आरत्या तर खूप ओरडूनच म्हटल्या पाहिजेत अशी आपली पारंपारिक समजूत आहे. सर्वात विडंबन म्हणजे आरतीनंतर म्हटले जाणारे “देवे ” म्हणजेच मंत्रपुष्पांजली ! हे खरेतर एक आद्य राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. अतिशय सुंदर रचना आणि मंत्रमुग्ध करणारे हे मंत्र , अनेक ठिकाणी मात्र सामूहिकपणे देवावर खेकसत , –देवाच्या अंगावर धावून जात, त्याला खडसावून काही विचारतोय अशा तऱ्हेने म्हटले जातात. दोन शब्दांमधले अवग्रह ( म्हणजे SSS चिन्हांकीत लांब आकार ) कितीही वेळ ताणून धरून एकमेकांकडे पाहत जुगलबंदीचा आनंद घेतला जातो.

भरकटत चाललेली ही मराठी सांस्कृतिक चाल आपणच सावरायला हवी. अधिकाधिक मंडळींनी , गणपतीची पूजा – आरती ही जास्तीतजास्त योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायला हवा. बाकीचा उत्सव हा मनोरंजनासाठी असतोच ना ?

— मकरंद करंदीकर
अंधेरी ( पूर्व ), मुंबई ४०००६९

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

1 Comment on गणपतीची आरती करूया… आक्रस्ताळा गोंधळ नको !!

  1. नमस्कार.
    आरत्यांबद्दलचें, तुमच्या लेखातलें सद्यस्थितीबद्दलचें वर्णन व मत, यांच्याशी मी सहमत आहे.
    – फक्त एक गोष्ट — ‘ ॐ जय जगदीश हरे’ ही हिंदीतील एक पॉप्युलर आरती आहे. जसें आपल्या मराठी आरत्यांना एक ठराविक चाल असते, त्याचप्रमाणें हिंदीतील अनेक आरत्या या ‘जय जगदीश हरे’ च्या चालीवर म्हटल्या जातात.
    – अनेक पॉप्युलर लोकगीतें ( आरत्याही ) सिनेमात घेतलीं जातात – जसें की ‘झूठ बोले कौवा काटे’, ‘झूमका गिरा रे, बरेली के बाज़ार में’ (ज्याच्यावरून प्रेरणा घेऊन गदिमांनी ‘बुगडी माझी सांडली गऽ’ हें गीत रचलें), ही लोकगीतेंच आहेत..(अर्थात्, सिनेमात घेतांना, कवी ती जशीच्या तशी घेत नाहीं, आपल्याला हवे तसे बदल करतो). तसेंच या जय जगदीश हरे या आरतीचें.
    – सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..