गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे.
१९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम करत नाही. फक्त२५%च काम करते आहे मी त्यांना जमेल तेव्हा ताजी कमळे खायला दिली. नंतर कमळे सुकवूनकेलेल्या गोळ्या दिल्या. चार महिन्यानी एक दिवस मला सकाळी९वाजता चौबळांचा फोन आला.”ताप आल्यामुळे पूजा नर्सिंग होम मधे आहे. आज सकाळी पावणे आकरा वाजता येऊन भेटा.’ मी म्हटले”अहो सकाळी१०-४५ला शक्य नाही , वाँटर प्रुफिंगसाठी माणसाना कामाला लावायला जायचे आहे. १२ वाजता येतो .’तेम्हणाले “नाही १०-४५लाच या. बाकी मला माहिती नाही ‘आणि फोन ठेवून दिला. मी पावणे आकराला नाईलाने गेलो. चौबळानी मला बसयला सांगितले .व मी सांगे पर्यंत उठायचे नाही असे सांगितले.मी वैतागून बसून राहिलो कामे दिसत होती. पण इलाज नव्हता. तेव्हड्यात डॉ क्टर आले. त्यांनी चौबळाना तपासले. ठीक आहे म्हणून जाऊ लागले. चौबळानी डॉ ना विचारले हार्ट कसे आहे? त्यावर डॉ क्टर म्हणाले चौबळ तुमचे हार्ट१००%काम करते आहे. किती वेळा सांगू. का लिहून देऊ. आणि डॉ क्टर गेले. नंतर चौबळ मला म्हणाले माझे हार्ट१००% काम करत आहे हे मला तुम्हाला डॉ क्टरांच्या तोंडून ऐकायचे होते. म्हणून त्रास दिला. कारण हे तुमच्या कमळाच्या गोळ्यामुळे झाले. मी गेली दहा वर्षे डॉ च्या गोळ्या खाल्या पण फायदा नव्हता.
आपल्या पूर्वजानी गणपतीला कमळ आवडते सांगून सर्वसामान्याचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. देवाला जे प्रिय ते माणसाला उपयुक्त! त्यांनी धंदा केला नाही म्हणून ते अडाणी होते का?
मला वाटते दर वर्षी गणपतीला कमळ वाहून झाल्यावर दुसरे दिवशी ते कमळ पाण्यात २४तास भिजत ठेवावे .नंतर ते पाणी सर्वानी प्यावे. म्हणजे वर्ष भर हार्ट सेफ राहयाला मदत होईल. ज्यांना हार्टचा त्रास आहे त्यांनी रोज कमळाचे सरबत करून प्यावे फायदा होण्याची शक्यता आहे. किमान त्रास नक्की नाही.
— अरविंद जोशी. B,Sc,
9421948894
हा मेसेज फाँर्वड करताना कोणताही बदल करु नये
Leave a Reply