नवीन लेखन...

गण्याच्या करामती

शिवापूर गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला.वळणा वळणाच्या रस्त्यानी वेढलेल्या या गांवचा सौंदर्य काय सांगायचा. मनोहर मनसंतोष गड, रांगणा गड या सारख्या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या छोटयाश्या गांवात गणेश नार्वेकर नांवाचो व्यक्ती रहायचो. घर तसा मातयेचाच. पण नळयांनी शाकारलेला. लोक आवडीन त्येका गणो नार्वेकार म्हणान ओळखत. घरात आवशी बापाशी सोबत गणो – हवा. गावात कोण त्याका ओळखत न्हवते असा नाय.येळा काळाक सगळयांच्या धावणारो गणो डोक्यान हुशार पण शिक्षणान अडाणी.घरात अठरा विश्व दारीद्र.आवशी बापाशीन लोकांची मोलमजूरी करून त्येका शिकवण्याचो खुप प्रयत्न केल्यानी पण गणो काय शिकाचा नावच घेयना.त्यायेळी गांवात शाळा नसल्यामुळे आवशी बापाशीन त्येका दुकानवाडीक शाळेत घातल्यानी. खांडेकर मास्तर त्यावेळी मुख्याध्यापक ,कडक शिस्तीचे पण तेवढेच करारी. जरा जरी शाळेत येवक उशीर झालो तरी शाळेच्या ग्राउंडाक धा फेरो मारूक लावत.

एक दिवस मास्तरांनी मुलांका मनाचे श्लोक लिहून आणूक सांगीतल्यानी. गण्याक कायता कळला नाय. गण्यान आपल्या मनाक येतीत ते श्लोक लिहील्यान आणी शाळेत घेवन इलो. खांडेकर मास्तर वर्गात इले. परीपाठाचो तास सुरू झालो. मास्तरांनी सर्वांका इचारल्यानी कोणी कोणी मनाचे श्लोक लिहून आणले? सर्वांचे हात वर. मास्तरांनी गण्याक उठवल्यानी. गणो धडपडत उठलो आणी मनाचे श्लोक म्हणाक सुरवात केल्यान.

फाटेक उठान चायक भजावे
तोंडाक लावावे कॉलगेट
कॉलगेट नसता लावावे शेळकुंड
नायतरी हळकुंड सर्वजण

चाय नसस्ता केल्यार ढोरा सोडावी
नदयेक न्हेवावी धुवावक
ढोरा इल्यावर पेजेक भजावे
आडवे पडावे बाकडयावर

बरोबर बाराक जेवक बसाचा
आडवो हात मारूचो उकडया भाता
बरोबर लोणचा आणी कुळथाची पिठी
राहो नये उपाशी कदापीही
सांजेर पुन्हा ढोरा सोडावी
काठीया मोडावी फाल्यासाठी
डोक्यार भारो लाकडाचो घेउन
माघारी फिरावे घराकडे
सांजेक पुन्हा उकडयाचो निवळ
सोबत कुवळ निस्त्याकाचो
रात्री मस्त ताणून दयावे
फाल्याचे बघावे फाल्याक
ऐसा नित्यनेम रोजच करावा
प्रारब्धाचा विचार सोडून दयावा
गणू म्हणे ऐसे कैसे हे जीवन
दाखवा दाखवा अभ्यासानं भले झाला

वर्गात एकच हशा पिकलो. मास्तरानी गण्याक ओल्या माडाच्या हिरानी उलटो सुलटो सोलल्यानी. मास्तर म्हणाले गण्या तूका रामदास स्वामीनी सांगीतलेले मनाचे श्लोक लिहून आणूक सांगीतले होते तु काय केलस हया. गणो म्हणालो मास्तरानू तुम्ही आमका मनाचे श्लोक लिवन आणूक सांगीतल्ये त्याप्रमाणे मी माझ्या मनाचे श्लोक लिउन आण्लय त्यात माझा काय चुकला? तुम्ही असा सांगूक नाय की रामदास स्वामीनी सांगीतलेले मनाचे श्लोक लिउन आणा म्हणून….तसा सांगीतला असतास तर तशे मी श्लोक लिउन आणले असते. मास्तरानी कपाळावर हात मारल्यानी व दाखलोच काढून हातात दिल्यानी.

गणो शाळेतून कायमचो बंद झालो. आई वडीलांनी त्येका शेतीक जुंपल्यानी.गणो आपल्या आये बाबांबरोबर शेतात जाउक लागलो.त्यावेळी बैलाचा जॉत.नांगर,गुठो,जू ,ढेपळो घेउन जॉत कसा बांधूचा, शात कसा नांगरूचा,ढेपळा कशी फोडूची कायच माहीत नसल्याने गणो बाचाकलो.तरी धीर करून गण्यान बैलाचा जॉत धरूक सुरवात केल्यान.जोराचो वारो पाउस सुरूवात झालो.त्याच्या आयेबाबानी सोबत आणलेला इरला,कांबळा जा काय बरोबर होता ता डोक्यार घेतल्यानी.परंतु गण्याच्या डोक्यार कायच नसल्याने पावसात भिजत जॉत सुरू ठेवल्यान.त्यावेळी नांगराचो जू सुटलो आणी बैल जू सकट शेजारच्या नाना तामाणेकरांच्या शेतात घूसले.नानाचा सगळा शात बैलानी सफाय केल्यानी नानाक कळल्या बरोबर नाना धावत शेताकडे इलो.बघता तर काय सगळा श्यात बैलानी उघ्वस्त केलेला.नाना गण्यावर खेकसले.गण्या,तुका जॉत धरूक येणा नाय तर धरलस कश्याक मेल्या.गणो शांत -हवान डोक्या खाजवक लागलो. गणो म्हणालो नानानु माझ्या बैलानी काय तुमचा वायट केल्यानी उलट तुमचा काम सोप्या केल्यानी.भात तुमका कापूक नको.मजूर लावक नको,मजूरी देवक नको व्यवस्थित कापून दिल्यानी.काय वायट केल्यानी वो माझ्या बैलानी तुमचा.मी म्हणतय काय वायट केल्यानी. नानांचो पारो आणखी चढलो तो उतारता उतरना.गणो थय थांबता कित्याक ऐशीन पळालो.

गण्याक भजनाचो खुप नाद.सणा समारंभाक सगळयांकडे गण्याचाच भजन असायचा.त्या दिवशी लउ सातार्डेकराकडे सत्यनारायणाची पूजा होती.गण्याक पूजेच्या रात्री भजनाचा निमंत्रण होता.घरात काय आसलेला ता खाउन गणो रात्री भजनाक भायर पडलो.लउ सातार्डेकराच्या घराकडे जाताना वाटेत धोंडी गावडयाचा घर लागता.धोंडीन घातलेल्या काकडेच्या येलाक भरपूर काकडे लागलेले होते.गण्यान जो काय काकडयार हात मारल्यान इचारूच नका.सगळो येल खाली केल्यान.आता काकडे ठेवचे खुय हो प्रश्न गण्याक पडलो.भजनाचो येळ झालेलो.भजनातले सवंगडी आधीच लउकडे पोचलेले.गणो भजनाचो बुवा असल्यामुळे भजनाक सुरवात कशी करतले.गण्यान काकडे लउच्या गवताच्या कुडयेत दडवन ठेवल्यान आणि भजनाक इलो.त्याका भजन कसाबसा आटपूचा होता कारण काकडे कोणाक न दिसता घराक न्हेवचे होते.गण्यान पहिल्या अभंगाक सुरूवात केल्यान पण लक्ष मात्र काकडयांकडे
आपण अभंग काय म्हणतय याकडे त्येचो लक्षच नव्हतो.

जातो माघारी पंढरीनाथा
काकडे धोंडग्याचे पळवलय आता
धोंडी गावडो घरांमंधी
काकडे दडवलय कुडयेबुडी
माका पाव रे तू जगन्नाथा

भजनातले सगळे गण्यार बघूक लागले. गण्या गण्या काय हुनतस हया.गणो भानार इलो.कसाबसा भजन आटपून उसळेचो खोलो आणि प्रसाद न घेताच गणो घराक पळालो. दुस-या दिवशी धोंडगो लगभगीन गण्याकडे इलो.गण्याच्या बापाशीक सगळा सांगल्यान.गणो म्हणालो मीच तुझे काकडे चोरलय कश्यावरून? धोंडी म्हणालो कालचा तुझा भजन ऐकाक मी इललय.पयल्याच अभंगात तु हुतलस मरे आणि आता नाय हुंत कसा.गणो म्हनलो अभंग तो मीच रचवललय त्याचा काय इतक्या मनार घेतस. तुझ्याकडे मीच तुझे काकडे चोरल्याचो काय पुरावो आसा काय? धोंडी निरूत्तर झालो.मुकाटयान घराक गेलो.

गणो जसजसो मोठो होउक लागलो तसतसा गण्याचा आता काय करूचा हो यक्ष प्रश्न गण्याच्या आयेबाबाक पडलो.गण्याक त्यानी खूप समजवल्यानी तू आता मोठो झालंस कायतरी करूक शिक,कमव असो ढोरासारखो फिरान तुझा होउचा नाय.पण गणो काय आपलाता सोडीना म्हणान त्याच्या आयेबाबानी त्याचा लगीन वाजवचा ठरवल्यानी.शेजारच्या वसोली गावतल्या सदा वेंगुर्लेकराचा चेडू शितल्याचा स्थळ म्हणान गण्याक चलान इला.त्यावेळी पत्रिका वगैरे बघूची पघ्दतच नव्हती. मुलगी बघूचो आयत्वाराचो दिस ठरलो.

आयत्वार उजाडलो तसो गणो,त्याचे आयेबाबा व कोणत्याही शुभ प्रसंगाक तिघानी जाव ने म्हणान चौथो शेजारच्या बंडयाक घेतल्यानी.गावात रस्त्याची व यष्टीची सोय नसल्याने नाना साळगांवकराच्या बैलगाडीन सगळे मुलगी बघूक निघाले.गण्यान घोळदार शर्ट व हत्तीपँट घातली होती. बैलाच्या घुंगुराचा आवाज करीत करीत गाडी केव्हा वसोली गावात पोचली ताच समाजला नाय.सदा वेंगुर्लेकराचा घर इचारीत इचारीत पांदीतून वाट काढीत गाडी सदाच्या घरी पोचली.सदाचो झील भायर होतो त्याने बैलगाडी इलेली बघल्यान आणि धावत पावणे इले, पावणे इले म्हणान ओरडत घरात गेलो.सदा भायर इलो.पावण्यानु बसा,बसा म्हणान फटकूर बसाक दिल्यान.त्यावेळी खुयची टेबला आणि खुर्च्यो. गणो आणि सर्व फटकूरावर बसले.सदयान शितल्याक पाणी आणूचो इशारो केल्यान.शितल्याक साडी न्हेसाक येत न्हवती.जशी येयत तशी न्हेसान पदर जमनीर लोळवत शितला पाणी आणी गुळाचो खडो घेवन भायर इला.सदा म्हणालो पावण्यानु तुमका काय प्रश्न विचारूचे असतीत तर विचारा.गण्यान नॉनस्टॉप प्रश्न विचारूक सुरवात केल्यान.तुका रांदुक येता काय? ढोरा राखुक येतत काय? पाणी आणूक येता काय? शाण भरूक येता काय? तरवो काढूक येता काय? ढेपळा फोडूक येतत काय?  सदाकडची मंडळी बघतच रवली.सदा म्हनलो पावण्यानु काय हया.गणो बोललो तुम्हीच प्रश्न इचारूक सांगलास त्यापरमाणे मी प्रश्न इचारलय.झाली बाबा मुलगा मुलगीची एकदाची पसंदी.देवघेवीचा इचारल्यावर सदा म्हणालो माझी परस्थिती नाय नुसतो नारळ घेवन मुलगी उभी करतलय.जमात तर बघा.गणो म्हणालो एक डवली तरी घालूक होई.माका काय आंगठी पोषाख नसलो तरी चलात. नुसती मुलगी उभी करा तुम्ही.दोन्ही बाजून मान्य झाला.लग्नाची तारीख ठरली.साखरपुडो व लगीन एकाच दिवशी करूचो ठरलो.लगीन मुलाच्या घरी करूचा ठरला.

लग्नाची तयारी सुरू झाली.कोण तांदुळ निवडता,कोण जात्यार दळता,कोण वायनात मसालो कांढता.पत्रीकेऐवजी नारळाचा निमंत्रण पैला देवाक नंतर गावाक, पै पावण्याक देवक सुरूवात झाली.पताके वगैरे लाउन माटव तयार झालो.फक्त लग्नाच्या आधल्या दिवशी भेडल्या माडाची सोपा तेवढी लावची ठेवली.गॉड जेवान झाला.आता माटव जेवणाचो दिस उजाडलो.लग्नाक फणसाची भाजी ठरलेली.पकल्या सावताकडून फणस आणून सोलूक सुरवात झाली. पै पाहुण्यानी घर भरान गेला.माटवाक भेडल्या माडाची सोपा लावली.लोकांक चाय,व खडखडो लाडू गण्यान वाटल्यान.गण्याक हळद लाउक सुरूवात झाली.स्पिकर बिकर लाउन झालो.ओवयो म्हणाक सुरूवात झाली.गणो म्हणालो माका हळद लावतात ती गोरो होउक की काय? मी आधीच गोरो आसय.माका आणखी गोरा होउचा नाय आसा.माका हळद लाव नकात.लोका सगळी त्याच्याकडे बघूक लागली.सगळयानी त्येका समजावल्यानी म्हणाले अरे लग्नापूर्वी पहीली हळदच लावतत ती काय गोरा होउक नाय, प्रथा आसा ती.त्याशिवाय लग्न करतच नाय.तेव्हा खय गण्याची टयुब पेटली.
लग्नाचो दिस उजाडलो.देवक ठेवला गेला.होकालकारांची वाट बघता बघता बैलाच्या गळयातल्या घुंगुरांचो खळखळाट कानार पडलो.साखरपुडयाची तयारी सुरू झाली.लगीन11.30 चा होता म्हणान साखरपुडो पटकन उरकून घेतलो.यजमानपानाक सुरूवात झाली.वल्लभ भटजीन मुहुर्त जवळ इलो म्हणून सांगीतल्यान.अंतरपाट धरून मंगलाष्टकाक सुरूवात झाली.भटजीनी वधूक घेवन येवक सांगीत्यानी.वधू इली.लग्नाची शेवटची मंगलाष्टका सुरू झाली.
आली लग्न घटी समीप नवरा घेवोनी या वा घरा

त्याचवेळी गणो भटजीक म्हणालो न्हवरीक घराक घेवन येतत. न्हव-याक नाय. काय म्हणतस मंगलाष्टका. असा म्हण

आली लग्नघटी समिप नवरी घेवोनी यावी घरी

आता लग्नात काय करतलं भटजीन तसा म्हटल्यान आणि एकदाची गण्याच्या गळयात माळ पडली.लगीन आटापला.खडखडे लाडू आणि फावे वाटले गेले.झाला एकदाचा लग्न.आता शितल्यान त्येका व्यवस्थित ताळयार आणल्यान.

— सुनिल सदाशिव प्रभु

लेखकाचा परीचय – जन्म 6 जून 1970. जिल्हापरीषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत. दै.तरूण मधील आम्ही बॅचलर व गजालीतले दिवस गजालीतली माणसे या सदराखाली लेख प्रसिध्द. प्राध्यापक, शिक्षक तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात खादी ग्रामोदयोक प्रोजेक्टवर उललेखनिय काम केल्याबददल आकाशवाणी चंद्रपूरवरून मुलाखत प्रसारीत व सत्कार.

Avatar
About सुनिल सदाशिव प्रभु 1 Article
जन्म 6 जून 1970. शिक्षण- एम.कॉम.जी.डी.सी.एॅंड ए. जिल्हापरीषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात कार्यरत.दै.तरूण मधील आम्ही बॅचलर व गजालीतले दिवस गजालीतली माणसे या सदराखाली लेख प्रसिध्द . प्राध्यापक , शिक्षक तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयात खादी ग्रामोदयोक प्रोजेक्टवर उललेखनिय काम केल्याबददल आकाशवाणी चंद्रपूरवरून मुलाखत प्रसारीत व सत्कार .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..