‘गांव’ या शब्दाचा जन्म कसा झाला, त्याचा अर्थ काय या प्रश्न मला सतावत होते. शब्दांचा मागोवा घेणे ही माझी खोड आहे आणि त्यानुसार मी या शब्दांचा माग काढत गेलो आणि मोठी विलक्षण माहिती माझ्या हाती आली..
मित्रांनो, ‘गांव’ हा शब्द चक्क ‘गाय’ म्हणजे ‘गो’ या शब्दातून जन्मला आहे. नाही ना विश्वास बसत?
आता हा कसा जन्मला? तर पुर्विच्या काळी शेतीचा शोध लागुन भटका माणूस स्थीर झाला होता. गाई-गुरे ही या माणसांची संपत्ती समजली जायची. (गाईला देव मानण्याची कल्पना इथेच जन्मली कारण शेतीसाठी आवश्यक बैलांना ती जन्म द्यायची). माणसांच्या वस्तीत गाईला मोठा मान होता. त्या विवक्षीत वस्तीतील गाई त्या वस्ती भोवतीच्या ज्या परिसरात फिरत ती संपूर्ण जागा त्या गाईंच्या मालकीची समजण्याची प्रथा होती. ‘ही आमच्या गाईंची जागा’ असे त्याकाळचे लोक दुस-या वस्तीतील लोकांना सांगत असत. ‘गाय’ या शब्दाचा काळाच्या ओघात गाव असा अपभ्रंश झाला आणि पुढे-पुढे ‘ही आमच्या गांवची जागा’ असे वाक्य तयार झाले आणि आणखी पुढे हे वाक्य ‘ हे आमचे गांव’ असे स्थीर झाले..’आणि हो, त्या ठराविक वस्तीतल्या गाई त्या गांवच्या सभोवताली ज्या परिसरात चरत तो सभोवताल त्या गांवची सीमा झाली.
गांवाला ‘ग्राम’ हा समस्कृत प्रतीशब्द आर्यांकडून नंतर दिला गेला असावा असा माझा अंदाज आहे. ‘गांव’ हा शब्द आर्यपूर्व काळापासून आपल्या देशात वापरात असावा असेही माझे मत आहे. आपल्या परिचयाचे कोणी भाषाशास्त्रज्ञ असल्यास आपणं याची जरूर माहिती घ्यावी.
‘गांवा’ला ‘मौजे’ असंही आता आता पर्यंत म्हणत. हा शब्द विशेषतः पोस्टाच्या पत्त्यात असायचा हे मला पक्क आठवतयं. तर मित्रांनो, ‘मौजे’ हा शब्द ‘मौजअ’ वा ‘मौझा’ या मुळ अरबी शब्दावरून आला असून त्याचा ‘अरबी’ अर्थ ‘गांव’ असाच आहे.
‘खुर्द’ हा असाच एक फारसी भाषेतला शब्द. याचाही अर्थ गांवच परंतू लहान गांव. ‘खुर्द’ शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ‘सुटे किंवा किरकोळ पैसे’. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द’.
‘बुद्रुक’ हा शब्द ‘बुजुर्ग’ या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून ‘बुजुर्ग’ म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे..मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे ‘बुद्रुक’. शेजारी वसलेली किरकोळ वसती म्हणजे ‘खुर्द’..!
गांवासाठी असलेला आणखी एक शब्द म्हणजे ‘खेडं’. हा शब्द ‘क्षेत्र’ या शब्दाचा अपभ्रंश आहे.
कास पटलं का?
गांवाच्या सरकारी कामकाजात नित्य वापरले जाणारे तहसील, सारा, वसूल, परगणा (प्रांत), अर्ज, नोंद, फेरफार, फिर्यादी असे अनेक शब्द मुळ ‘अरबी किंवा फारसी’ आहेत. आपल्या देशावर मुघलांचा अंमल असताना अरबी/फारसी भाषा ही राज्यकारभाराची भाषा होती त्याचा हा परिणाम..! आज हे शब्द इतके आपले झालेत की ते परके आहे असे कोणी म्हणाले तर आपणं त्याला वेड्यात काढू नाही का?
जाता जाता –
इंग्रजी Village हा शब्द Villa या शब्दापासून तयार झाला आहे आणि Villa म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. अनेक Villa मिळून तयार झालेली वस्ती ती Village.
तसाच गांवासाठी आणखी एक शब्द वापरला जातो, ‘कसबा’. हा शब्द बहुतकरून हिंदी भाषेत वापरला जातो. या शब्दाची व्युत्पत्ती दोन प्रकारे समजली जाते. काही तज्ञांच म्हणने आहे की ‘कसबा’ हा शब्द ऊत्तर अमेरीकन ‘quasbah’ या शब्दावरून तयार झाला आहे व हा उ.अमेरीकन शब्द ‘Casa’ म्हणजे किल्ला या शब्दापासून तयार झाला आहे. आपल्या देशात हा शब्द मुघल राजवटीत आला. अरबी भाषेत हा शब्द ‘कस्बह’ असा आहे व त्याचा अर्थ जुन गांव वा मुळ गांव वा बाजाराचं गांव असा होतो.
मी लिहीलेला लेख आपल्याला कसा वाटला, त्यात काही चुकीची नाहिती आहे किंवा तुमच्यकडे काही जास्तीची माहिती असल्यास मला अवश्य कळवावे. आपला प्रतिसाद मिळाल्यास लिहायला आणखी मजा येते. शेवटी आपणं वाचणारे आहात म्हणून लिहीण्यात मजा आहे.
— गणेश साळुंखे
09321811091
टाकळी या शब्दाचा काही वेगळा अर्थ आहे का महाराष्ट्रात बरीच टाकळी नावाची गावे आहेत
Thank you for your article sir. Mazya dokyat satat ha mauje, budruk, Khurd baddal janun ghenyachi utsuktta hoti.
खूप छान
Nice, we were debating on what are meanings of all these words. My father in law, who worked as revenue officer could explain the same logic. Keep writing.
Thank you sir
नाहोती नको माहीती
सर, ‘खेडं’ हा शब्द ‘क्षेत्र’ या शब्दाचा अपभ्रंश कसा झाला..? याचा संदर्भ स्पष्ट करणे शक्य असल्यास कृपया स्पष्ट करावे…बाकी माहीती उत्तम….
खूपच छान