मातेच्या उदरांत असतां,
जाण असते त्या जीवाला,
प्रभूचाच मी अंश आहे,
सांगत असतो तो सर्वाला ।।१।।
सो s हं चा निनाद सतत,
कानास आमच्या ऐकूं येतो,
‘तो’ मीच आहे शब्दाने,
आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।
मातेच्या उदरांतूनी बाहेरी,
पडतां स्वतंत्र जन्म मिळे,
नाश पावूनी साऱ्या स्मृति,
स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।
आतां त्याचा निनाद ‘को..हं’,
प्रश्न युक्त तो भरला असे,
“मी कोण आहे ?” विचारी सर्वां,
उलघडा त्यास होत नसे ।।४।।
जाणून घेण्या स्वत: विषयीं,
सारे आयुष्य खर्च करती
पुनरपि येतां स्मृति त्याला,
प्रभूमय हे सारे भासती ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply