नवीन लेखन...

गरिबांचा संसार

संसार म्हटले की कटकटी या आल्याच या संसारामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटा संसार यामध्ये मुला मुलींची संख्या एक किंवा दोन असते. वडिलांच्या पासून काही ना श्रीमंती लाभलेली असते याला छोटा संस्था म्हणतात. मोठा संसार म्हणजे घरात दहा पंधरा माणसे त्यात मिळवणारे कमी लहान मुलांचा व मुलींचा कपडा लता. शाळेची फी पाटी पुस्तक या वस्तू आल्यास या वस्तू असल्याशिवाय शाळा शिकता येत नाही. माणूस जगायचा झाला तर त्याला अन्न, वस्त्र, व निवारा या तीन गोष्टी असल्या म्हणजे माणूस जगू शकतो. गोरगरिबांची अवस्था सध्या अतिशय बिकट अशी आहे त्याला कारणे सुद्धा तशीच आहेत. एक तर न शिकल्यामुळे कुठे नोकरी मिळत नाही त्यामुळे दुसऱ्याच्या शेतामध्ये शेती रोजगार केल्याशिवाय पोट चालत नाही. गावामध्ये काही लोकांना जमिनी नाहीत त्यांचीही अशीच अवस्था आहे तरीपण माणूस म्हणून जगणे हे स्वाभाविक आहे. संसार हा भातुकलीचा खेळ आहे असे म्हटले आहे हा खेळ खेळत असताना अर्ध्या आयुष्याची वाट लागली तर संसार संपत नाही. संसार हा एक माणसाला लागलेला शाप आहे आणि या शापातून मुक्तता लवकर होत नाही मुक्तता शेवटी शेवटी होते. आयुष्यभर काबाडकष्ट करून एकदा शरीर थकले की त्या संसारी माणसाचा काही उपयोग होत नाही त्याला,, आयुष्यातील बोनस दिवस असे म्हटले जाते,, गरिबांचा संसार डोळ्यांनी पाहिलं की काळीज कसं आतल्या आत करपून जातं कारण प्रत्येक वेळी डोळ्याला चांगली दिसेल असे मला वाटत नाही ग्रामीण भागातील माणसं अतिशय अडचणीत आहेत. हे चित्र स्पष्ट होतं छोट्याशा झोपडी मध्ये विटाची चूल करून भाकरी थापत असलेली शेतकऱ्याची बायको. व बाजूला बसलेला तिचा तो पती दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करणारी ही ग्रामीण भागातील मंडळी होय….।

…. याला सुखी जीवन म्हणता येईल का या लोकांच्या मागे दुःख डोंगराएवढी तर सुख राळ्या एवढे. अशी मंडळी सुखदुःखाचा विचार न करता रात्री जेवण करून स्वतःच्या झोपडीमध्ये निवांत झोपी गेलेली असतात. कुणाच्या छपराच्या बाजूला घनदाट हिरवीगार झाडी समजा एखादा सरपटणारा सर्प तिथे आला तर या लोकांची काय अवस्था होईल याची,, गणती,, कराय नको एवढे मात्र निश्चित. या संसारावरती अनेक कवींनी गीते सुद्धा लिहिले आहे जे पुढे दिसले तेच लिहिले कारण वास्तव कुणालाच नाकारता येत नाही. पूर्वीचे राजे प्रधानजी आता दिसत नाहीत तो एक काळ तसा होता. ज्येष्ठ कवीत्री बहिणाबाई चौधरी यांनी संसारावर माणसावर आणि निसर्गावर रसाळ कविता लिहिल्या आहेत. म्हणून ही अशिक्षित स्त्री आज जगामध्ये प्रसिद्ध आहे हे कोणालाच नाकारता येत नाही बहिणाबाई स्वतःच्या कविता मध्ये लिहितात,,
…. अरे संसार संसार, आधी हाताला चटके.
…. हाताला चटके, तवा मिळते भाकर.
अतिशय सुंदर सुंदर अशा कविता बहिणाबाईंनी लिहिल्या आहेत यांच्या कविता पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ विद्यापीठाला सुद्धा यांच्या कविता आहेत. समाज युक्त लेखनाची कधीही दाद घेतली जाते प्रत्येक लेखकाला वाटते माझा एकांदा पाठ पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये लागावा. आज रोजी पुष्कळ लेखक लोक वसुली बाजी करताना दिसतात परंतु समाज युक्त साहित्य असेल तर याचा जरूर विचार होतो. ग्रामीण भागामध्ये पुष्कळ लिहिण्यासारखे विषय आहेत परंतु लेखक मंडळी लिहीत नाही ग्रामीण भागातील बारकावे चौकस बुद्धीने लिहिले तर साहित्य निर्मिती वास्तववादी तयार होते. पण हल्लीचा लेखक काय लिहितो हे त्यालाच माहीत मी असा आहे मी तसा आहे मी प्राचार्य आहे अशी बनवाबनवी केली जाते. अशीच मंडळी घुसखोरी करून साहित्य क्षेत्रात दिसत आहे हे उघड आहे….।

… पूर्वीचे पाटील इनामदार आता गेले आहेत या भारत देशामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याच्यावरती लिहावे. समाजापुढे हा नवीन विषय नाही का परवा तर एक फोन आला ती व्यक्ती म्हणाली सर मला प्रेमावरती कविता लिहायची आहे. काय एखादी आयडिया सांगता का मी म्हणालो महाराष्ट्रातील कवीला दुसरा विषय सापडत नाही वाटतं. प्रत्येक जण उठतो आणि प्रेमावर कविता लिहीत आहे प्रेम हा सुद्धा आता जुना विषय झाला आहे. प्रेमावर कितीतरी पिक्चर निघाले कितीतरी गाणी निघाली आता त्यात राहिलंच काय. निसर्गावर कविता लिहा झाडावरती कविता लिहा पक्षावर लिहा स्वतःची परिस्थिती व परिस्थितीचे भांडवल ही कवी मंडळी का करते याचा मला नेहमी प्रश्न पडतो. समाजांन त्या साहित्यातून काहीतरी घेतले पाहिजे वाचकाला दिशा मिळाली पाहिजे असे साहित्य का निर्माण होत नाही असे सुद्धा मला काही वेळा वाटते. एखाद्याच गोष्टीचा उदो उदो करणे याला काय अर्थ आहे,, मध्यंतरी,, सैराट,, या नावाचा चित्रपट निघाला होता हा चित्रपट पाहून काय कथानक घडलं हे सर्वांना माहित आहे असे निकष निघाले तर पिक्चरला किंवा साहित्याला काय अर्थ आहे असे वाटते. सैराट सारख्या चित्रपटाने धुमाकूळ घातला तो चित्रपट वेगवेगळ्या भाषेत निघाला यातून निकष काय आहे काही सुद्धा नाही. हे झाले साहित्यचे ग्रामीण भागामध्ये पोटासाठी गोरगरीब मजूर म्हणून काम करत आहे त्याच्यावरती सुंदर लिहिण्यासारखा विषय आहे. परंतु गरिबाला कुठे स्थान नाही त्याला का प्रसिद्ध देऊ नये गरीब हा सुद्धा साहित्याचा एक फार मोठा भाग आहे. तुमच्या पायाला ठेच लागली म्हणजे आई म्हणता त्यावेळी बाप का आठवत नाही. हल्लीचे लेखक मंडळी स्वतःच्या साहित्याचा बाजार भयंकर करतात ग्रामीण भागातील दुखणे यांना कधी कळणार. ग्रामीण भाषेत सुंदर विषय व या विषयातून चांगला निकष निघतो पण असं कोणी लिहीत नाही. यामुळेच मार्केटमध्ये काहींची पुस्तके खपत नाहीत हे मोठे नवल आहे लेखक हा समाजाचा फार मोठा घटक आहे. त्याची नजर चौफेर असून वाचन तगडं पाहिजे त्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. एक-दोन पुस्तकावर लेखक म्हणून मिळणारी मंडळी साहित्य त्या बाजारामध्ये त्यांना कोण ओळखतो. भयंकर मी पण मी फार मोठा वक्ता असे म्हणून पुढे पुढे धावणारी ही मंडळी. ही सुद्धा मंडळी डोक्यातील भांडवल संपले म्हणजे काय करतात पाहूया. वाचनच कमी असल्यानंतर तो काय लिहिणार आणि त्यामध्ये पुरस्कार घेण्याची धडपड ही मंडळी स्वतःला काय समजते समजत नाही. नवोदित कवींनी जुन्या कवींची पुस्तके वाचावीत म्हणजे तुम्ही कुठे आहात हे लवकर समजेल. मला परवा परवा एका प्रकाशाचा फोन आला साहेब तुम्ही कवी लोक माझ्याकडे पाठवू नका. कवितेची पुस्तके कोणीही घेत नाही व कवितेला सध्या मार्केट नाही एखाद्या वेळी कथा कादंबरी चालेल. हे ऐकून मला हसू वाट मी प्रकाशकाला म्हणालो ठीक आहे सर सध्या असंच चालू आहे हे चटकन लक्षात आलं….।
… पूर्णविराम…।

–दत्तात्रय पांडुरंग मानगुडे,

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..