पूर्वी मला प्रश्न पडायचा गटार आणि गटारी यांचा काय संबंध …?
पण गटारीच्या दिवशी दारू पिऊन गटारात लोळणारे पाहिले
की काही तरी संबंध असेलच असे सहज वाटून जायचे…
गटारी म्हणजे कोंबड्यांच्या जीवावर संक्रात…
गटारी कोंबड्याना काळा दिवस वाटत असेल नाही…
श्रावणात मांसाहार – मद्यपान करायचे नाही म्हणून त्याच्या अगोदर साजरा केलेला सण म्हणजे गटारी… गतहारी आमावस्या
सुज्ञ लोक दीप आमावस्याही म्हणतात म्हणे…
बारा महिने दारु पिणारे आणि मांसाहार करणारेही गटारी साजरी करतात
कोणत्या हक्काने ते तेच जाणे… देव जाणे मुद्दामच म्हणालो नाही…
पवित्र महिन्याची सुरुवात अशी व्हावी …
हे आपल्या संस्कृतीचे दुर्भाग्य आहे…
दारूत लोळणारी पिढी गटारीच्या नावावर…
संस्कृती तरी कशी जपणार ..?
ती अपेक्षाही नाही..
कारण जगात दारू पिण्यात म्हणे !
भारताचा तिसरा नंबर लागतो….
पुढून…
कवी – निलेश बामणे
Leave a Reply