नवीन लेखन...

गाठोडे आठवणीचे

गावी माझ्या घरासमोर मोठे अंगण होते आणि सावलीही बऱ्यापैकी. चार वाजून गेले किंवा त्या आधीही कधी कधी बोहारीण यायची. भांडी…. भांडी… अशी जोरात ओरडत आली की बऱ्याच बायका आमच्या अंगणात जुन्या कपड्यांचे गाठोडे घेऊन यायच्या. घासाघीस करून एखादे भांडे मनासारखे मिळाले की आंनदात जायच्या. प्रत्येक वेळी ही माझी पहिलीच बोहनी असे म्हणत भांडे द्यायची. डोक्यावर जड टोपली. खांद्यावर गाठोडे अडकवलेले कधी कधी एखादी आपल्या बाळाला कमरेला बांधलेल्या झोळीत घेऊन यायची.
माझी एक ठरलेली होती. नाकी डोळी छान सावळी आली की बाई… अशी हाक ऐकली की मी हातातील कामे सोडून धावायची. तिच्या डोक्यावरून टोपली उतरून खाली ठेवायला मदत केली की मलाच डोक्यावरचे ओझे उतरल्या सारखे वाटायचे. अगोदर तांब्याभर पाणी घटघटा पिऊन झाल्यावर पदराला तोंड पुसत सावलीत बसून एका डब्यात आणलेली भाकरी कशाही बरोबर खायला लागली की मी तिला भाजी भात वगैरे द्यायची. पण भात मात्र डब्यात भरून ठेवायची. मला माहित होते की मुलासाठी जीव अडकतो तिचा म्हणून. दिवसभर हिंडणे. ओरडणे. घासाघीस करणे. आणि त्यावर प्रंपच्याला हातभार लावणे खरच जिकरीचे असते. आणि तसेही पूर्वी फार कपडे नसायचे त्यामुळे चांगले कपडे मिळणे अवघडच होते. त्यातही काही जण गुंड्या काढून मगच कपडे देणार. ही सगळी डागडुजी करून ती विकून किती पैसे मिळतात हे देवच जाणे. अनेक वेळा चारपाच जणी संध्याकाळी आमच्या अंगणात बसून ती गाठोडी उघडून त्यातील एकेक कपडा मैत्रीणाला दाखवून खूप खुश व्हायच्या. एखादा चांगला सदरा. फ्रॉक. लहान मुलांचे कपडे बाजूला ठेवून आपल्या मुलाच्या अंगावर कसे दिसतील याचे स्वप्न रंगवत सांगायच्या. नंतर सगळ्याच कपड्यांच्या घड्या घालून त्याचे भले मोठे गाठोडे बांधून तयार. त्यांची मैत्री व धडपड पाहून मला खूप कौतुक वाटायचं म्हणून मी अधूनमधून त्यांना चहा प्यायला द्यायची. आज बोहारीण दिसत नाहीत ऑनलाईन भांडी घरपोच येतात. सांगितले जाते तेवढे पैसे पाठवले जातात. पैसा भरपूर आहे. पण माझे वेडे मन त्या गाठोड्यातच आंनदी आहे. त्यामुळे या भांड्यात मन रमत नाही….
त्या मैत्रिणींची मैत्री आठवली. आणि विचार केला की आपल्या आयुष्यात देखिल असेच अनेक आठवणींने भरलेले एक मोठे गाठोडे आहे. त्यातील एकेक घडी काढून बघतांना सुखाचे कपडे बाजूला ठेवून किती सुंदर स्वप्नात रमता येते. तर कधी कधी एखादे फाटलेले कपडे दिसले की नको असलेले प्रसंग आठवून मानसिक त्रास होतो. आणि मग परत एकदा ते सगळे एकत्रित करून त्याचे गाठोडे तयार. जशा त्या एखाद्या दिवशी जमून एकमेकांना ते कपडे दाखवून मनातील भावना व्यक्त करत होत्या. तसेच आपण सगळे या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भेटून आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करतो ना तेव्हा ते गाठोडे जड वाटत नाही. असा माझा अनुभव आहे. तुमचे मत असेच आहे ना?
— सौ कुमुद ढवळेकर.

1 Comment on गाठोडे आठवणीचे

  1. aapale lekh khup chan asataat aamhalahi junya aathawani jagawatat.dhanyawad he anubhav sarvanach asatat te tumhi mandata dhanywad

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..