लक्ष्मण माने यांना मी साता-याला भेटलो आहे. मध्यंतरी त्यांच्यावर काही आरोप झाले होते त्याचे पुढे काय झाले ते कळले नाही. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला याची कारणे देणारा लेख मात्र तमाम हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे.
बौद्धधर्म हि एक स्वतंत्र विचार धारा आहे. गौतम बुद्धाचा जन्म हिंदू राज घराण्यात झाला होता .बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून खरे तर हिंदू समाजावर उपकारच केले आहेत.
कल्पना करा कि – बाबासाहेबांनी बौद्ध धर्म न स्वीकारता मुस्लिम अथवा ख्रिस्ती धर्म स्वीकारला असता तर या देशांत काय झाले असते. दलितांवर परंपरागत शेकडो वर्षे केलेल्या अत्याचाराची परिणीती म्हणजे प.पु. बाबासाहेबांचे धर्मांतर हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. या नंतरचा काळ कसा असेल याची कल्पना या लेखातून आली आहे. मी या लेखाशी पूर्णपणे सहमत आहे. समाजात potential difference असलेली अनेक माणसे असतात. पण त्यांना समाजानी नीट वागणूक दिली नाही तर असे धर्मांतर होते.
आपल्या देशाच्या पूर्वेकडील अनेक राष्ट्र बौद्ध धर्मियांनी व्यापली आहेत. दलितांनी हा धर्म स्वीकारला म्हणून या धर्मालाच “दलित” लेखण्याचा मूर्खपणा काही मंडळी करीत असतात. पूर्वी काही मंडळींना हा धोका जाणवला होता म्हणून त्यांनी गौतम बुद्धाला विष्णूचा १० वा अवतार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू-बौद्ध याच मातीत वाढले, मोठे झाले याची जाणीव सतत ठेवून वागले पाहिजे. माउली त्यांच्या पसायदानातून सतत हाच तर संदेश देतात. पण लक्षात कोण घेतोय ?
असो सर्व बौद्ध आणि हिंदू भावंडांना शुभ कामना. हरी ओम !!! नमो बुद्धाय !!!!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply