ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात. पशुपक्ष्यांची भाषा समजत नाही पण दोन पायाच्या माणसाची भाषा त्याचे वागणे व दैनंदिन जीवन हा एक चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. मला काही वेळा असे वाटते की या समाजामध्ये वावरणाऱ्या मानवाचे आपण काहीतरी देणे आहोत. आयुष्यमान जगत असताना प्रत्येक मानवाला आलेले अनुभव आणि संसारी खेळ या खेळातून लवकर सुटका होत नाही. म्हणूनच या वितभर पोटासाठी त्यांची चाललेली धडपड हेच मुख्य ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळते. गावामध्ये माणसे भेटतील त्यांचे स्वभाव ही समजतील पण त्यांच्या खोडी व अंगातील अवगुण लवकर समजत नाहीत. अंगामध्ये अवगुण असणारी माणसे यांची सारखीच धडपड चालू असते. त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे हे उघड्या जगातील लोकांना लवकर काही समजत नाही. गावामध्ये घरटी एक दोन माणूस शेती काम करतो दिवसभर कष्ट करतो आणि चार पैसे कसे जमतील आणि संसार सुखाचा कसा होईल याकडे लक्ष संसारी माणसाचे लागलेलं असते. हे सारे वीतभर पोटासाठी मानवप्राण्याची चाललेली धडपड व त्यांचे दैनंदिन जीवन याचा अभ्यास सखोल अशा पद्धतीने मी नेहमी करत असतो…।
,,,, त्यांचीही आयुष्य जगण्यासाठी एक फार मोठी कसरत आहे आणि या कसरीती मध्ये काहींचा विजय होतो तर काहींचा पराजय सुद्धा होऊ शकतो. आज प्रत्येक गोष्टीला शास्त्र आणि शास्त्र आहे संसार या गोष्टीला कोणते शास्त्र आहे आणि ते कसे वापरावे केव्हा यातून सुटका होईल. असेठाम उत्तर कोणत्या पुस्तकामध्ये सापडत नाही कारण संसार हा खेळ इतर खेळापेक्षा वेगळा आणि आगळा असा आहे. ग्रामीण भागामध्ये काही माणसे म्हणीचा वापर करून म्हणतात,,,, संसार केला घाई घाई, आणि पदरात पैसा बाधायनाही. संसार हा गडबडीचा विषय नसून शांत डोके डोक्यातील विचार करून योग्य निर्णय घेणे याला संसार म्हणतात असे मला वाटते. कारण प्रत्येक शब्दाला काहीतरी वेगळा अर्थ आहे त्याप्रमाणे योग्य वाटचाल केल्यास संसारामध्ये अडचण येत नाही परंतु वाट चुकीची सापडली तर माणसाच्या जीवनाचे व जगण्याची होरपळ झाल्याशिवाय राहत नाही. संसाराचे सार प्रत्येक मानवाने समजावून विचाराने केल्यास जीवन सुखी होईल कारण संसार हा एक विचाराचा फार मोठा डोंगर आहे की कुणीही विसरू नये. दुरून डोंगर फार सुंदर दिसतो पण डोंगरावर चढताना काटे कुठे असतात एकांदी वस्तू हातात धरली तर सुटते आणि सुटली तर चावते अशी अवस्था सुद्धा संसारी माणसाच्या जीवनामधुन पुष्कळ वेळा घेऊन गेलेली आहे. म्हणूनच शेजारच्या माणसाने एखादी नवीन वस्तू आणली तर त्याच्या शेजारच्या माणसाच्या मनामध्ये ईशा निर्माण होते. हा एक ग्रामीण भागामध्ये विषय पाहावयास मिळतो शेजाऱ्यांनी नवीन वस्तू कशी आणली हा विचार न करता हीच वस्तू माझ्या घरात कशी याचा विचार आजचा मानव करतो. पण हे चुकीचे आहे हे त्याच्या लक्षात येत नाही परंतु असा मानव म्हणत नाही परमेश्वरा त्या अगोदर सरळ कर नंतर माझेकर. हा एक दृष्टीचा चष्मा हा चष्मा तर बिना नंबर चा आहे मानवी जीवन यातील बारकावे हा विचार न करता वीतभर पोटासाठी काही माणसे धडपड करीत असतात त्यापैकी हा रंगा होय…।
… रंगाचे वय अंदाजे ४० ते ४५ पर्यंत असावे एक मुलगी झाल्यानंतर मुलगी लहान असताना रंगाच्या बायकोने शेवटचा श्वास घेतला आणि रंगाला व लहान मुलीला ती सोडून देवाघरी गेली. संसाराचा सारी जबाबदारी रंगावर पडली लहान मुलीला सांभाळले पाहिजे किती लग्न केले पाहिजे तिच्या पोटापाण्याला खायला घातले पाहिजे तिला चांगला कपडा घेतला पाहिजे. म्हणून बायकोच्या मृत्युनंतर हा रंगा दुसऱ्याच्या शेतामध्ये मजुरी करू लागला. अंगामध्ये पांढरा फुल सदरा पांढरे धोतर डोकीला टोपी आणि तोंडामध्ये तंबाखूचा तोबरा हा ठेवलेला नेहमी असायचाच. तो गावांमध्ये काहीवेळा खंडाची कामे अंगावर घेऊन जीवाचे रान करून पैसा कमवत होता व मुलीच्या लग्नासाठी पैसा जमा करत होता. तो काहीवेळा बोलताना विनोद सुद्धा करीत असे परंतु त्याच्या जवळ एक खोड होती दिवसा गावातील माणसे कामाला गेली म्हणजे. त्यांच्या कोंबडा कोंबडीची चोरी हा रंगा करीत असे ही त्याची एक स्पेशल सवय होती. आठवड्यातून दोन दिवस रंगा अजिबात शेती कामाला जात नसेल आठवड्यातून म्हणजे मंगळवार व रविवार या दोन दिवसांमध्ये त्याला मटन खायाचीतलफ होत होती म्हणून तो गावातील कोंबड्यांची दुपारच्या वेळी चोरी करत असे. कोंबडा किंवा कोंबडी त्यांच्या घरातील माणसांना भित नसे परंतु हा रंगा आला की त्याला घेऊन गावातील कोंबड्या लांब पळून जात होत्या. इतकी भीती या कोंबड्यानी खाली होत काहीवेळा रंगा ज र एखाद्या वाटेने जात असेल तर कोंबडा कोंबडी त्याला पुढे जाण्यासाठी वाट द्यायचे इतकी भीती कोंबड्यांनी खाल्ली होती. आठवड्यातून दोन दिवस रंगाच्या चुलीवर मटन शिजत होते परंतु हे मटण कोठून आणले विकत आणले का चोरून आणले त्याची मुलगी किंवा शेजारीपाजारी रंगाला कुणी विचारीत नव्हते. आठवड्यातून दोन कोंबड्या चोरी होतात हे गावाला माहित होते पण गावात कोंबडी चोर कोण आहे याचा पत्ता लागत नव्हता. कारण दिवसभर शेतात काम करायला गावातील माणसे जात असत. सकाळीखुरूडयातून कोंबड्या सोडून घरातील बायका शेतात कामाला जात होते. दिवसभर शेतात कष्ट करून त्या बायका वैतागून जात होत्या रात्रीच्या वेळी प्रत्येकाच्या कोंबड्या आपल्या खुरूडया मध्ये येऊन बसत होते पण आपल्या कोंबड्या किती आहेत याचे मोजमाप लागत नव्हते. हा रांगा एखाद्या दिवशी नाही कोंबडी सापडली तर वैतागून जायचा एखाद्याने विचारले तर रंगा काय चालले आहे तुझे रंगा म्हणायचा आज रंगाचा बेरंग झाला आहे असे म्हणून तो घराकडे जात असेल. हा रंगा चाळीस फूट खजुरी दोरा घेऊन त्या दोरीला ठराविक अंतरावर एक शेंगदाणा बांधून ति दोरी जिथे कोंबड्या जास्त आहेत तिथे टाकत असे. कोंबड्याने किंवा कोंबडीने शेंगदाणा चोचीत घेऊन नरड्यात गेला म्हणजे ती दोरी हळूहळू रंगा ओढीत असे आणि कोंबडा किंवा कोंबडी पकडून घरी घेऊन जात असे. असा चोरीचा व्यवसाय त्याचा बरेच दिवस चालू होता गावातली कोंबड्या दिवसान दिवस बेपत्ता होत होत्या. रंगाला मटन पाहिजे असल्यास तो हा धंदा आठवड्यातून दोन दिवस करीत असे. एके दिवशी रंगा कोंबडा घेऊन घरी जात असता तुका नाना ने हा प्रकार दुपारी पाहिला आणि रंगाला म्हणाला..।
,,,, काय रंगा कोंबडा किती पैशाला घेतला म्हणायचा आणि कुठून आणला..।
,,, नाना आज मंगळवार नव सकाळ सकाळीपलसाला जाऊन खरेदी केला…।
,,, किती पैशाला घेतला नाना म्हणाला..।
,,,, आपलं हेच की मला बुरुंगवाडी चा केदारी भेटला तो मला म्हणाला एक कोंबडा शिल्लक आहे तो तू घेऊन जा पैकं नंतर दे म्हणून घेऊन आलो आहे रंगा म्हणाला…।
,,, पण गावामध्ये अफवा उठली आहे नाना म्हणाला..।
,,,, काय अफवा आणि ती कसली..।
,,, गेली काही दिवस गावामध्ये कोणतरी कोंबडा चोर सुटला आहे असे लोक म्हणतात..।
,,, नाना लोक म्हणू देत मला त्याचे घेणे देणे नाही मी काय सराईतचोर आहे का गावातील कोंबड्या चोरी होतात ते मला कसे माहित..।
,,, कारण चोर तुला माहीत असला पाहिजे कारण आठवड्यातून दोन दिवस तू गावात असतोस म्हणून विचारलं नाना म्हणाले..।
,,, मी काय पोलीस आहे का, का गावचा कोतवाल काय नाना माणसं बघून बोला मी गरीब आहे हे मला मान्य आहे. पण चोर म्हणून तुम्ही शिक्का माझ्या अंगावर मारू नका मी गरीब माणूस तुम्हाला माहित आहे आणि गावाच्या बाहेर माझी झोपडी आहे हेसुद्धा तुम्हाला माहित आहे. आमची राजी बारकी असताना तिची आई मिली या मुलीला हाताच्या फोडासारखे मी सांभाळली आहे हे गावाला माहित आहे. बरं येऊ का रंगा म्हणाला..।
नानांचा निरोप घेऊन रंगा भयभीत होऊन घरी जाऊ लागला नाना बरोबर बोलताना त्याला घाम फुटला होता. मी इतके दिवस चोरी करतो हे जवळजवळ गावाला माहित पडले आहे परवा मी केलेली चोरी या चोरीमध्ये नानांचा कोंबडा आहे की काय. याचा विचार रंगाच्या मनात येऊ लागला तो आज पूर्णपणे भयभीत झाला होता आज ना उद्या मी करतोतीचोरी गाववाल्यांनी पहिलीच्या माझे काय होईल असा विचार करीत तो घराकडे चालला होता. वाटेतच केला हंबीरराव पाटील भेटले त्याने हा प्रकार पाहिला आणि रंगाच्या शर्टाला धरून गावात आणले. आता तर रंगाची पूर्णपणे दातखिळी बसली होती काय बोलावं हे त्याला सुचेना हंबीररावांनी त्याला ग्रामपंचायतीमध्ये कोंबडी यासह आज टाकले. व सायंकाळी पाच वाजता कोंबडा चोर सापडला आहे असे गावातील लोकांना माहित पडू लागले. गावातील बरीच मंडळी ग्रामपंचायती च्या समोर उभी राहिली होती आणि रंगाला मुद्देमालासह उभे केले. गावातील काही मंडळी म्हणू लागली रंगाला चांगला बडवूनकाढा पण पंच म्हणाले मारू नका हा गरीब आहे त्याला चोरी करायची सवय पहिल्यापासून आहे हे मला माहित आहे. एवढ्या वेळेला याला आपण सोडून देऊ कारण बेघर वस्तीमध्ये हा रंगा राहतो हे गावाला माहित आहे त्यांनी चुकी केली हे त्याला मान्य आहे मी त्याला सारे विचारले आहे. त्याला आपण क्षमा करून पाहूया काय सुधारणा होते का सुधारणा झाली तर ठीक नाहीतर त्याला आपण काठीने फोडून काढू काय रंगा खरे आहे का..।
,,, होय मी चुकी केली पण मला मारू नका आज पासून मी चोरी करणार नाही अगदी माझ्या मुलीच्या गळयाशपथ रंगा म्हणाला..।
गावांनी रंगाला माफ केले रंगा का खेत कोंबडा घेऊन सर्वांची क्षमा मागून निघून गेला तेव्हापासून या रंगाने चोरी करायची सोडून दिली. या जगामध्ये सारेच रावण नाहीत काही राम सुद्धा आहेत रंगाची परस्थिती एकदम गरिबीची आहे म्हणून त्याला गावाने सोडून देईल. परवा तो गाठ पडला होता मी म्हणालो तुझा बेरंग कुठे गेला तो मला म्हणाला आता बी रंग गेला आणि रंग आला आता मी शहाणा झालो आहे तेही गाव वाल्या च्या कृपेने असे म्हणून तो लक्ष्मीच्या देवळाकडे पळत गेला..।
… मंडळी ही कथा अतिशय जुनी आहे या कथेतील पात्रे सध्या जिवंत नाहीत. ही कथा अतिशय मोठी आहे कथेचा महत्त्वाचा भाग. गावाकडची गोष्ट मध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे धन्यवाद…।
-– दत्तात्रय पांडुरंग मानुगडे,
ग्रामीण कथा लेखक..।
Leave a Reply