ग्रामीण भागामध्ये पुष्कळ लिहिण्यासारखे असते बारीक-सारीक गोष्टी या गोष्टीला अतिशय महत्त्व साहित्यामध्ये निर्माण झालेले असते. पूर्वी याच माझ्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची फार गैरसोय होती नरसोबाच्या वाटेला. सुबराव आण्णा यांची एक विहीर व आनंदा खोत यांची एक विहीर या दोन विहिरी उन्हाळी पावसाळी पाण्याने भरलेल्या असायच्या. परंतु या गावच्या आडाला आडला सुद्धा पाणी भरपूर असायचे. परंतु ज्यावेळी 1971 72 चा दुष्काळ पडला होता तेव्हा आमच्या गावच्या आडाचे पाणी फार कमी झाले होते याच दुष्काळामध्ये वरील दोन विहिरीला सुद्धा पाणी कमी होते. परंतु गावातील स्त्री-पुरुष या दोन विहिरीचे पाणी व गावातील या आडाचे पाणी रोज भरत असे. असा हा माझ्या जन्मापूर्वीचा गावचा आड माझ्या लक्षातून कधीच जात नाही.ऐन पावसाळ्यामध्ये या आडाला भरपूर पाणी असायचे त्यावेळी मी लहान होतो मला चांगले आठवते. ग वर गणपतीच्या वेळी आनंत चतुर्थीच्या दिवशी याच गावच्या आडा मध्ये सोपान कुंभाराने पूजेसाठी दिलेला चिखलाचा दोन हाताचा गणपती. विसर्जन करायला जात असे अनंत चतुर्थी दिवशी आम्ही सर्व मुलांनी गावच्या आडा जवळ गणपतीची आरती केली. आणि माझ्यासोबत आमच्या आळीतील चार पाच मुले होती गणपतीची आरती झाल्यावर सर्व मुले म्हणू लागली,,, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. असे म्हणून ती गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जन केले सर्वांनी चुरमुऱ्याचा प्रसाद खाल्ला. आणि आम्ही मुले आमच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर आई मला म्हणाली..।
गणपती विसर्जन केलास का..।
होय मी म्हणालो..।
जाताना आपला पितळेचा तांब्या घेऊन गेला होतास तो तांब्या आणला स का आई म्हणाली..।
आई असे म्हणताच मी जाताना तांब्या घेऊन गेलो होतो हे चटकन माझ्या लक्षात आले आणि मी आडाकडे पळत सुटलो. मी गणपती विसर्जन करून आल्यावर दोन-तीन माणसे आडाचे पाणी राहटा वरून ओढत होते हे मी पाहिले होते. आडा जवळ एक लाईटचा खांब आहे परंतु त्या खांबावरचा बल गेला होता आडा भौती सर्वत्र अंधार पसरला होता. माणसे गावातीलच होती पण ती कोण होती मला अंधारात दिसले नाही. मी पळत पळत आडा कडे गेलो आणि तांब्या शोधू लागलो परंतु मला तांब्या दिसला नाही. शिवाय आडावर सुद्धा कुणी माणूस नव्हते मला तांब्या सापडला नाही परंतु माझा तांब्या कुणी घरी घेऊन गेला असेल याची मला काळजी लागली होती. याच आडावर माझ्या तांब्याची चोरी झाली होती मी तसाच घरी गेलो आणि आई ला सांगितले. मला तांब्या सापडला नाही आई म्हणाली जाऊदे तू काय बी करू नको. अशा साऱ्या आठवणी मला अजून आठवतात हा पाण्याचा आड अजून सुद्धा पूर्वीसारखा आहे तसाच मला दिसून आला. हा आड अतिशय भाग्यशाली आहे याच आडा वरून राहटा च्या साह्याने मी कितीतरी वेळा लोखंडी साखळी लावून पाणी ओढले होते. सकाळ व संध्याकाळ याच आडावरून पाणी घेऊन घरी जात होतो. हा रा हाट माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. पत्र्याची गळकी घागर घेऊन मी आमच्या घरामध्ये पाणी भरले आहे ही आठवण येते..।
याच आडा मध्ये माझ्या आत्याचा मुलगा पाणी उपसत असताना आडा मध्ये पडला होता याचीही आठवण झाली. युग बदलले गावामध्ये सुधारणा येऊ लागल्या कृष्णा नदीचे पाणी नळाच्या साह्याने गावात येऊ लागले. कृष्णा आली रे अंगणी असा सर्व माणसांना आनंद झाला. पण हा आड किती महत्वाचा आहे याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये अजूनही आहे. मंडळी याच आडावर मी लोखंडी साखळीने बांधलेली घागर आणि त्यातून आलेले पाणी हे मला अमृतासारखे वाटतात. परवा मी गावी गेलो होतो आणि आडा ची आठवण झाली आणि माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गावात पाणी आल्यामुळे या आडाचा रहाट पूर्णपणे गंजून गेला होता. परंतु जुनी आठवण लक्षात येत होती. याच राहा टाला गंज चढलेला मला दिसत होता आणि अवतीभवती झाडी वाढली होती. गावात पाणी आले परंतु हा गावातील पाण्याचा आड निवांतपणे स्थिर झालेला दिसत होता. मंडळी आठवणी अमर असतात परंतु ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन सुधारणा आल्यामुळे. अशा जुन्या गोष्टी दुर्मिळ होतात याची साक्ष स्वतःचे मन देते एवढे मात्र निश्चित. याच राहाटा प्रमाणे आयुष्याच्या शेवटी माणसे गंजून जातात. याप्रमाणे हा रहाट गंजून गेला आहे याची जाणीव झाली. असेच या कलीयुगातील माणसाचे जीवन आहे आयुष्यभर गोरगरिबांच्या माना मोडून कमीव लेल्या जमिनी. मरताना बरोबर येणार आहेत का म्हणूनच माणसाने जिवंत असताना एकमेकाचा आत्मा जाणला तर. या राहाटा सारखे गंजून मारावी लागेल या जगामध्ये कोणाचेच काही नाही. अंगावरचा शर्ट सुद्धा या मानवाचा नाही मग ही सारी धडपड कशासाठी. आशा ही फार मोठी आहे असे प्रमाणे जगला तर शेवट मात्र निश्चित आहे हे जाणून घेण्याची बुद्धीमध्ये क्षमता हवी.
पूर्णविराम…।
दत्तात्रय मानुगडे उर्फ नाना..।
Leave a Reply