जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा. नाहीतर थांबला तो संपला या वाक्याप्रमाणे अनपेक्षित पणे मनातील गवाक्षाने शोधलेलं पदरात पडलेलं चांदणं वेचता आलंच नसतं. आणी त्या पदरातील चांदण्याचं तेज मिरवत जीवनाचा चेहराही उजळायचा राहून गेला असता. पण तरीही एक सल कायमच उरी राहते की हा उजळ्लेला चेहरा कुणालाही दिसत नसतो की, त्या चांदणं ल्यालेल्या चेह-याकडे सोयीस्करपणे ड़ोळेझाक केली जाते..नेमका अर्थ आपआपल्या वैचारीक कुवतीनूसार लावला जात असावा कदाचीत ..तूला जाणवलाय का ? चांदण ल्यालेला चेहरा ….मला विश्वास आहेच. तू नक्कीच सुखावला असणार चांदणं ल्यालेला चेहरा पाहून कारण तू आहेसच
विश्रब्ध
© वर्षा पतके -थोटे
31-01-2019
Leave a Reply