प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार म्हणतात..
एकदा एक विचार मनात आला.
कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?
◆ मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!
◆ मन्ना डे हे दूध आहेत.
पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !
◆ गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
येवू घातलेली झोप उडवतात.
◆ आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.
◆ महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
सोनेरी, उत्तम दर्जा आणि ॲएडिक्टिव्ह…!
◆ तलत मेहमूद…म्हणजे उसाचा रस..!
एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
जास्त घेवू शकणे अशक्य…!
◆ महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.
◆ किशोर कुमार चहा आहेत.
कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!
आणि शेवटी….
◆ लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!
— व्हॉटसअॅप वरुन
Leave a Reply