नवीन लेखन...

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जात.त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले होती.

पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ जेतपूर गुजरात येथे झाला.

१९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है..’ या गाण्याने पंकज उदास घराघरांत पोहोचले. पंकज उदास यांनी एक से बढकर एक गझल देत रसिकांना त्यांच्या दुनियेत मश्गुल केले.सारं काही विसरायला लावणाऱ्या गझल आजही रसिकांच्या गुणगुणताना दिसतात. त्यांच्या या प्रयत्नांनी भारतातील गझल क्षेत्राला व गझल गायनालाच एक नवीन उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.भारतातील गझल गायनातील एक मोठे नाव म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत असतानाच त्यांनी उर्दु भाषेचा अभ्यास केला होता.यानंतर त्यांनी ‘गझल’ या गायन प्रकाराकडे वाटचाल केली.पंकज उदास यांचा संपूर्ण परिवार संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे बंधू पंकज मनहर उदास हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वपगायक तर दुसरे वडील बंधू निर्मल उदासदेखील प्रसिध्द गझल गायक आहे.या संगीतप्रेमी परिवारात जन्म घेणार्याद पंकज यांनी बीपीटीआय भावनगर येथून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हा परिवार मुंबई येथे आला.मुंबईला आल्यावर पंकज यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला.मनहर उदास यांनी पंकज यांना प्रथम स्टेजवर गाण्याची संधी मिळवून दिली. १९७१ साली त्यांना पहिल्यांदा ‘कर्मा’ या चित्रपटामध्ये पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली.मात्र त्यांच्या गाण्याची विशेष दखल घेण्यात आली नाही.‘कर्मा’ चित्रपटातील गाण्याची विशेष दखल न घेतल्यामुळे ते कॅनडाला रवाना झाले तिथे त्यांनी लहान-मोठ्या समारंभामध्ये गाण्यास सुरुवात केली.कॅनडामध्ये लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला.मात्र तरीदेखील पंकज उधास यांना कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या काळात किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांसारखे प्रसिद्ध गायक असल्यामुळे पंकज यांना १९७९ पर्यंत त्यांना खडतर प्रवास करावा लागला. स्वत: ची कारकिर्द घडवत असतानाच त्यांना ‘जबाव’ या चित्रपटातील ‘मितवा रे मितवा’ या गाण्यासाठी पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. पंकज यांनी या संधीचे सोन करत आपल्या यशाच्या पाय-या चढण्यास सुरुवात केली. या गाण्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हे गाणं त्या काळी विशेष लोकप्रिय ठरले. ‘मितवा रे मितवा’ने लोकप्रियता मिळविल्यानंतर आपण ‘गझल’ या गायन क्षेत्रात करिअर घडवू शकतो ही जाणीव पंकज यांना झाली. त्यानंतर त्यांनी १९८६ साली ‘चिठ्ठी आई है’ हे सुपरहिट गाणं गायले. यानंतर त्यांनी स्वत: ला पूर्णपणे ‘गझल’ या गायन प्रकाराकडे झोकून दिलं.

‘चिठ्ठी आई है…’ या गाण्याची आठवण सांगताना पंकज उदास म्हणत,अभिनेता राजेंद्र कुमार यांनी ‘नाम’ हा चित्रपट निर्माण केला होता.एकदिवस मला त्यांचा फोन आला.तुला माझ्या चित्रपटात अॅंक्टिंग करायची आहे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर हो म्हणावे की नाही,हेच मला कळत नव्हते.कारण अॅतक्टिंग म्हटल्यावर मला दरदरून घाम फुटला होता. फोन करतो, म्हणून मी त्यावेळी वेळ मारून नेली. पण जाणीवपूर्वक फोन करणे टाळले. यानंतर काही दिवसांनी राजेंद्र कुमार यांनी माझ्या मोठ्या भावाला फोन केला. तुझा लहान भाऊ पंकज अतिशय उद्धट आहे रे. तो मला फोन करणार होता आणि त्याने केलाच नाही,असे त्यांनी माझ्या भावाला सांगितले.हा निरोप माझ्यापर्यंत पोहोचला आणि मग मी असली नसली सगळी हिंमत जुटवून राजेंद्र कुमार यांना फोन केला. मग कुठे, या गाण्यामागची पार्श्वभूमी त्यांनी मला समजावून सांगितली.तू चित्रपटात पंकज उधास म्हणूनच दिसशील,असे त्यांनी मला सांगितले आणि नंतर मी हे गाणे केले.

या गाण्यानंतर त्यांना ‘घायल’, ‘साजन’, ‘ये दिल्लगी’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ आणि ‘मोहरा’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. दरम्यान, १९८० मध्ये त्यांच्या गाण्याचा पहिला अल्बम आला होता.त्यानंतर त्यांच्या गाण्यांच्या अल्बमचा धडाका सुरु झाला. १९८१ साली ‘मुकर्रर’, १९८२ साली ‘तरन्नुम’, १९८३ साली ‘महफिल’, तर १९८५ साली ‘नायाब’ हे त्यांचे काही अल्बम आले. पंकज उदास यांच्या गझलांनी जगभरात त्यांचे नाव पोहचवले.कॅसेटचा काळ असतानाचा सुपरहिट गायक अशी पंकज उधास यांची ओळख होती. ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है..’ ‘जिये तो जिये कैसे’, ‘और आहिस्ता’ अशी किती तरी गाणी आहेत जी आजही प्रेक्षकांना आठवतात ती त्यांच्या शब्दांमुळे आणि पंकज उधास यांच्या मधुर आवाजामुळे.

त्यांची प्रेमकथाही चित्रपटाला शोभेल अशीच होती.सत्तरीच्या दशकात पंकज उदास यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या फरीदा यांना पाहिले आणि त्याक्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले.एका शेजाऱ्यानेच फरीदा आणि पंकज यांची पहिली भेट घडविली. त्यावेळी पंकज ग्रॅज्युएशन करत होते आणि फरीदा या एअर होस्टेस होत्या. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे त्यांना घरच्यांच्या मर्जीने आणि आशिर्वादाने लग्न व्हावे, असे वाटत होते.

गझल गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरविले होते. पंकज उधास हे १९८६ साली लीला मुळगावकर यांच्या प्रयत्नाने स्थापन झालेल्या ‘पीएटीयूटी’चे अध्यक्ष राहिले आहेत. या संस्थेची स्थापना सेंट जॉर्ज रुग्णालय प्रादेशिक रक्तपेढीतील थॅलेसेमिया रोगापासून पीडित अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या हेतूने झाली आहे.

२६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचे निधन झाले.

– संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..