आपल्या लेखणीने मराठी गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचा जन्म १ मार्च रोजी १९४६ सांगली जवळील दुधगाव येथे झाला.
इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.
इलाही जमादार यांची शब्दांवर चांगली पकड होती. शब्दांची जाण असल्यामुळे त्यांच्या कविता थेट मनाला भिडत. इलाही जमादार महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि व महाराष्ट्राबाहरील इंदूरमध्ये स्वतंत्र काव्यवाचनाचे व मराठी ग़ज़लांच्या संदर्भातील प्रश्नोत्तरांचे जाहीर कार्यक्रम करत असत.
इलाही जमादार यांनी अनेक कविसंमेलने व मुशायरे यात भाग घेतला होता. इलाही यांनी ‘जखमा अशा सुगंधी’ आणि ‘महफिल-ए-इलाही’ या नावांचे मराठी, उर्दू काव्यवाचनाचे जाहीर कार्यक्रम केले होते. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेत असत.
इलाही जमादार यांचे ३१ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply