अंधार पडला आहे
उजेडाचे गाणे गा
वेदना असह्य आहे
सुखाचे गीत गा
रडणे आता भाग आहे
हसण्याचे गाणे गा
समोर नागफणा आहे
स्तब्धतेचे गीत गा
अपघात अटळ आहे
सावरण्या गाणे गा
मरणा जवळ आहे
जीवनाचे गीत गा
युद्धाचा ढग आहे
शांतीचे गाणे गा
निस्तेज मन आहे
प्रसन्नतेचे गीत गा
गाण्यांना संगीत आहे
मानवता रीत जगा
निसर्ग ढळतो आहे
समर्पणाचे गीत गा
— विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, बीड.
Leave a Reply