गीत माझेच मी गात असता
का लागती ना सूर माझे
आज प्रथमच तुझ्याविना मी
प्रेमगीत गातोय माझे ।
मैफीलही तीच आहे
सखे रात्रही तशीच आहे
परी आज माझ्या सुरांना
ना पुर्वीचे ते माधुर्य आहे ।
गेलीस मजसी सोडून तू
शब्दही पोरके करुन माझे
कसे रसिकांना मग भावतील
ज्यात नाहीत स्वर तुझे ।
शब्दांना माझ्या सवय होती
आपल्या युगलस्वरानी बहरण्याची
कसे मम कंठातून ते बरसतील
सवय त्यांना ग युगलस्वरांची ।
— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
२५ जुलै २०१८