गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते.
राजकपूर यांच्यासोबत त्यांनी ‘बांवरे नैन’ आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत ‘आनंदमठ’ सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला ‘जब से तुमको देखा है’ होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर मा.गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.मा.गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply