गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषद ही पदवी मिळाली आहे. आपल्याला विद्या प्राप्त करावयाची असेल तर विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टींचे जतन केले पाहिजे असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी गीतेसंबंधी असे भाष्य केले आहे कि भगवतगीता हा ताटिबक प्रबंध नसून तो एक धार्मिक ग्रंथ आहे. त्यात सत्याचे सम्यक दर्शन घडते इतकेच नव्हे तर मानवधर्माचे त्रिकालाबाधित स्वरूपही कळते.
मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुध्द एकादशीला मंगल सुप्रभाती कुरूक्षेत्राच्या रणभूमीवर योगेश्वर श्रीकृष्णाने जीवनाचा दिव्य संदेश, महान विचार दिला. योगेश्वरांच्या त्या ज्ञान प्रवाहातून भारताला गीतेसारखा अव्दितीय अमोल ग्रंथ लाभला.
गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Leave a Reply