ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला.
जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अॅचनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
१९५८ साली जीन डेच यांना त्यांच्या सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे (ऑस्कर्स) नामांकन मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९६० साली त्यांना मुनरो या त्यांच्या अॅ निमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅननिमेशनपट म्हणून नामांकन मिळालं. त्यानंतर १९६४ साली हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेण्डशीप या दोन चित्रपटांसाठी जीन यांना सर्वोत्तम अॅयनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. जीन डेच यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स या कंपनीसाठी टेरीटून्सचे दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट, गॅस्टॉन ली क्रेऑन, क्लिट कॉब्लर आणि टेरीबल थॉम्पसन सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.
१९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम अॅकण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या अगदी नव्या सिरीजची निर्मिती केली होती. जीन डेच यांचे निधन १६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply