नवीन लेखन...

आनुवंशशास्त्र (भाग ३)

नात्यातल्या नात्यात लग्न झाल्यास आनुवंशिक आजार उद्भवतात असे आढळते. नात्यातील लग्नात, उदाहरणार्थ आतेभाऊ- मामेबहीण वा मामा- भाची इ., नवरा व बायको दोघांचे आजोबा/ पणजोबा इ.एकच असल्याने त्यांच्यातील सदोष जनुके दोघांमध्ये येण्याची, म्हणजेच दोघेही ‘कॅरिअर’ असण्याची शक्यता वाढते. कोणीही कधीही गर्भार राहिलं, तर नवीन येणाऱ्या बाळात रचनेचा वा कार्याचा काही ना काही दोष आढळण्याची एरवी ३-५ टक्के शक्यता गृहित धरली जाते. जवळच्या नात्यातल्या लग्नात ही शक्यता ६-१० टक्के इतकी वाढते. थोडक्यात ९० टक्के वेळा दोष उद्भवला नाही तरी ६-१० टक्के वेळेला गंभीर दोष पुढच्या पिढीत संक्रमित होऊ शकतो.

त्यामुळे पूर्वापार रूढी असली तरी नात्यातील लग्नसंबंध टाळणं हे | आनुवंशिक आजार टाळण्यासाठी नक्कीच हितकर असतं. अर्थात | केवळ योगायोगानेदेखील नवरा-बायकोत काही समान सदोष जनुके | येऊ शकतात. त्यामुळे नात्यातील लग्नाच्या संततीत हमखास दोष येणार वा नात्यातील लग्न नसल्यास आनुवंशिक दोष नक्की टळणार असे मुळीच नाही. हिमोफिलिआ, डुशेन मस्क्युलर डिस्ट्रोफीसारखे काही आजार फक्त मुलांमध्ये/ पुरुषांमध्येच आढळतात. स्त्री-पुरुषांमधील रंगसूत्रांच्या २३ जोड्यांपैकी १-२२ जोड्या या स्त्री-पुरुष दोघांतही असतात, ज्यांना ऑटोझोम्स म्हणतात. तेवीसावी जोडी मात्र स्त्रीमध्ये XX व पुरुषात XY अशी असते. X व Y हे सेक्स कोमोझोम्ज मानले जातात. वरील आजारांची जनुके X रंगसूत्रांवर असतात. स्त्रीमध्ये या जनुकांच्या एका प्रतीत दोष उत्पन्न झाला तर दुसऱ्या X रंगसूत्रांवरची निर्दोष जनुकं त्यांचं काम निभावून नेऊ शकतात. पुरुषात मात्र एकच X असल्यामुळे व Y रंगसूत्रांवर त्या जनुकाची जोडीची प्रत नसल्यामुळे त्या सदोष जनुकाचा परिणाम दिसून येतो. म्हणून सहसा स्त्रिया अशा आजाराच्या कॅरिअर असतात व पुढच्या पिढीत ते सदोष जनुक स्त्रीकडून जायची ५० टक्के शक्यता असते. प्रत्येक आनुवंशिक आजारासाठी एकेकच जनुक वा रंगसूत्रांतील दोष कारणीभूत असतो असे नाही. काही आजार १०० टक्के जनुकीय वा आनुवंशिक असतात, ज्यात एखादा गुणसूत्र/

रंगसूत्रातील दोष आजार उत्पन्न करायला, पुरेसा असतो. उदाहरणार्थ थॅलॅसिमिआ.
इतर काही आजारात जनुके व बा’ घटक, ज्यांना ‘एनव्हायमेंट’ म्हटलं जातं, यांच्या एकत्रित परिणामामुळे निर्माण होतात. जनुके त्या आजाराचा पाया रचतात तर इतर घटक जसे, की आहार/ विहार/ आचरण इ.तील अनियमितता/ दोष त्यावर कळस चढवितात आणि आजार लक्षात येतो. डायबेटीस हे एक जनुकं व जीवनशैलीच्या एकत्रित परिणामातून होणाऱ्या आजाराचं उदाहरण आहे. अनेक वेगवेगळी जनुके व बाह्य घटक या आजाराला हातभार लावतात.

डॉ. कौमुदी गोडबोले
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..