वर्षभर आपण सर्वजण निरनिराळे दिन साजरे करतो. उदा.अपंग दिन, प्रजासत्ताक दिन, बालदिन वगैरे त्या त्या दिनाचे स्वतःचे असे खास वैशिष्ट्य असते. त्याच धर्तीवर १९८८ पासून १४ जानेवारी हा दिवस भूगोलदिन म्हणून महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे साजरा केला जातो.
प्रा.चं.धुं.देशपांडे यांना भूगोल महर्षी म्हटले जाई. त्यांची दिल्लीपर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून ख्याती होती. सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या झाला होता.
त्यांच्या ७५ व्या जन्मदिनी असे ठरले गेले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा करायचा व २२ डिसेंबर पासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे हवामानातल्या संक्रमणाच्या बदलाचा प्रत्यक्ष अनुभव यायला १४ जानेवारीपासूनच आपल्याकडे सुरवात होते. म्हणूनही १४ जानेवारी या दिवसाला विशेष भौगोलिक महत्त्व आहे. याच दोन्ही गोष्टी मनात ठेवून ज्येष्ठ भूगोलतज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी राज्यात ‘भूगोल दिन’ साजरा करण्याची प्रथा १४ जानेवारी १९८८ पासून सुरू केली. त्यानुसार या दिवशी भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात.
पृथ्वीवर घडणाऱ्या नैसर्गिक व भौतिक घडामोडींचा मानवाच्या संदर्भात र्सवकष विचार करणारे शास्त्र म्हणजे ‘भूगोल’ होय. भुगोल या विषयासंदर्भात अनेकांना माहितीच नाही,शाळेत एक विषय म्हणून त्याच्याकडे बघीतले जाते.. भूगोल या विषयासंदर्भात रूची निर्माण होण्यासाठी हा विषय रंजक पध्दतीने शिकविला गेला पाहिजे. महाविद्यालयांमध्ये सुध्दा भूगोल अध्यापन पध्दतीबाबत उदासिनता दिसून येते. त्यामुळेच दहावीनंतर हा विषय अभ्यासाला घेतला जात नाही.
रॅटझेल हे जर्मन भूवैज्ञानिक हे मानवी भूगोलाची व्याखा करताना म्हणतात, मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.
भूगोल दिनाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply