नवीन लेखन...

बारकोडचे सहसंशोधक जॉर्ज लॉरर

बारकोडचे सहसंशोधक व अमेरिकी अभियंता जॉर्ज लॉरर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२५ रोजी झाला.

बहुतेक वस्तूंवर जी काळ्या रेघांची पट्टी दिसते त्याला बारकोड असे म्हणतात. तो १२ अंकांचा एक सांकेतांक असतो ज्यावरून ते उत्पादन ओळखता येते. आज जगात विक्रीसाठी असलेल्या बहुतांश वस्तूंवर बारकोड लावलेला असतो. किरकोळ विक्रीच्या क्षेत्रातील व्यवहार सर्वासाठीच ज्यामुळे सोपे झाले, त्या बारकोडचे सहसंशोधक व अमेरिकी अभियंता जॉर्ज लॉरर हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते. इयत्ता अकरावीत असताना त्यांनी सैन्यात भरती होऊन दुसऱ्या महायुद्धातही भाग घेतला होता. युद्धानंतर, त्यांनी रेडिओ आणि टीव्ही दुरुस्ती शिकण्यासाठी तांत्रिक शाळेत प्रवेश केला, परंतु त्याच्या शिक्षकांनी पटकन त्यांचे कौशल्य ओळखले आणि त्याऐवजी आपल्याला अभियांत्रिकीसाठी महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

१९७६ मध्ये त्यांना रेली (एनसी) च्या संशोधनाचा त्यावर्षाचा पुरस्कार मिळाला. लाऊरेर यांची सर्वात प्रसिद्ध निर्मिती असलेला ‘युपीसी’ प्रारंभी किराणा दुकानांच्या गटासाठी तयार केले गेली होती. जॉर्ज लॉरर यांनी तीन दशकांहून अधिक काळ आयबीएममध्ये काम केले आणि स्कॅनिंग आणि संगणक मेमरी डिव्हाइससाठी डझनभर पेटंट्‌स तयार केली. आयबीएम कंपनीत काम करीत असताना जॉजॅ लॉरर यांनी युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड म्हणजे बारकोड विकसित केले होते. हा बारकोड वाचण्यासाठी लागणारा स्कॅनरही त्यांनी विकसित केला. या बारकोडमध्ये आधी टिंबांचा समावेश होता त्याऐवजी लॉरर यांनी पट्टय़ांचा समावेश केला. बारकोडचा उपयोग जगभरात विविध ठिकाणी होतो.

बारकोड म्हणजे उपकरणाद्वारे वाचता येईल, अशा काळ्या पांढऱ्या रेषांच्या आकड्यांचा संच असतो, विविध वस्तू, कागदपत्र, परीक्षेच्या उत्तरपत्रिका आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बारकोडचा वापर होतो.

या बारकोडमध्ये किमतीचाही समावेश असल्याने किंमत लावताना होणाऱ्या चुका कमी होऊन हिशेबही सोपे झाले. पहिला बारकोड ओहिओ येथे जून १९७४ मध्ये रिंगलेच्या फ्रूट च्युइंग गमवर लावण्यात आला होता.

आयबीएममधील लॉरर यांचे सहकारी कर्मचारी नॉर्मन वूडलँड हे बारकोडचे मूळ संशोधक मानले जातात. त्यांनी मोर्सकोडवर आधारित बार कोड तयार केला होता. त्यासाठी त्यांनी १९५० मध्ये पेटंट घेतले पण ते पुढे जाऊ शकले नाहीत. काही वर्षांनी लॉरर यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली.

जॉर्ज लॉरर यांचे ५ डिसेंबर २०१९ रोजी अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथे निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..