जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म १२ जुलै १८६४ रोजी झाला.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती.
कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं – शेती , केमर्जी आणि मायकोलोजी. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. जॉर्ज वॉशिंग्टन काव्र्हर यांनी यावर उपाय म्हणून मोलवृद्धी (व्हॅल्यू अॅलडिशन) हा प्रकार शोधून काढला. पिकाची विक्री करण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून विविध अन्नपदार्थ बनवले आणि ते विकले, तर त्यातून जास्त नफा मिळतो, हे या मोलवृद्धीचे तत्त्व. अमेरिकेतील अलाबामा येथील आफ्रिकीवंशीयांच्या वस्तीतील शेतकऱ्यांना त्यांनी शेंगदाण्यापासून दूध, दही, चीज, क्रीम, कँडी, रंग, पॉलिश असे जवळपास ३०० पदार्थ बनविण्याची पद्धत आणि त्यातून पिकांची मोलवृद्धी शिकवली. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो.
लेखिका वीणा गवाणकर यांनी ‘एक होता कार्व्हर’ हे जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचे चरित्र लिहिले आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचे निधन ५ जानेवारी १९४३ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply