नवीन लेखन...

भूस्थिर उपग्रह

कृत्रिम उपग्रहांमुळे मानवी जीवनात अनेक गोष्टी पृथ्वीच्या विषुववृत्तावर असतो व तो पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. त्याची पृथ्वीभोवती फिरण्याची गती व दिशा (पश्चिमेकडून पूर्वेकडे) ही पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याची गती व दिशा यांच्या समान असते. त्याचा परिणाम म्हणून हा उपग्रह आपण पृथ्वीवरून बघितला असता स्थिर दिसतो, म्हणून त्याला भूस्थिर उपग्रह असे म्हणतात. हा उपग्रह विषुववृत्तावर ३६००० कि.मी. (२२३६९ मैल) उंचीवर असतो.

या उपग्रहाच्या भ्रमणपथाला क्लार्क बेल्ट असे म्हणतात. हे नाव प्रख्यात विज्ञान लेखक आर्थर सी. क्लार्क यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. या उपग्रहाकडून येणारे संदेश हे अँटेनाच्या मदतीने पकडता येतात. त्यासाठी अँटेना डिश वापरतात. अनेकदा असे अँटेना हे एका जागी लावले जातात. ट्रॅकिंग अँटेनापेक्षा ते कमी खर्चाचे असतात. साधारणपणे १२० अंश रेखांशावर तीन भूस्थिर उपग्रह फिरत असतील, तर संपूर्ण पृथ्वीवरचा भाग त्याच्या देखरेखीखाली येतो.

त्यात भौगोलिक उत्तर व दक्षिण ध्रुवाचा काही भाग समाविष्ट नसतो. भूस्थिर उपग्रहाचा कार्यकाल साधारणपणे दहा ते पंधरा वर्षांचा असतो. भूस्थिर उपग्रह हे प्रामुख्याने हवामान उपग्रह असतात. उपग्रह पृथ्वी, सूर्य व चंद्र तसेच इतर ग्रह यांच्यातील गुरुत्व बलामुळे त्यांच्या स्थानापासून किंचित सरकतात, त्यामुळे दूरध्वनी संभाषणात काहीशी अडचण निर्माण होते. रेडिओ संदेशही उशिरा मिळतात. भूस्थिर उपग्रहात जागतिक दळणवळण, दूरचित्रवाणी प्रक्षेपण, हवामान अंदाज यासाठी खास पेलोड असतात.

त्याचे काही संरक्षण व लष्करी उपयोगही असतात. भूस्थिर उपग्रहाची कल्पना सर्वप्रथम १९२८ मध्ये हम्रन पोटोनिक यांनी मांडली, पण ती लोकप्रिय करण्याचे काम विज्ञान लेखक आर्थर सी. क्लार्क यांनी १९४५ च्या सुमारास केले. हॅरॉल्ड रोसेन यांनी पहिला भूस्थिर उपग्रह तयार केला. त्याचे नाव सिनकॉम २ असे होते.

२६ जुलै १९६३ रोजी तो अमेरिकेत केप कॅनव्हरॉल येथून सोडण्यात आला. या उपग्रहाच्या मदतीने पहिले उपग्रह-नियंत्रित दूरध्वनी संभाषण झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी व नायजेरियाचे पंतप्रधान अबुबकर बालेवा यांच्यात त्या वेळी असे पहिले दूरध्वनी संभाषण झाले होते. इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट या उपग्रह मालिकेतील सर्वच उपग्रह हे भूस्थिर प्रकारातील असून एकूण २३ उपग्रह यात सोडले होते. त्यातील नऊ कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..