तापमान मोजण्याचे फॅरनहाइट हे प्रमाण विकसित करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते असे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचा जन्म १४ मे १६८६ रोजी झाला.
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट हे जरी जन्माने जर्मन असलेतरी शिक्षणानंतर त्यांचे सारे आयुष्य नेदरलँड्स देशात गेले.
इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ इव्हान्जेलिस्टा टोरीसेली यांनी १६४३ साली हवेचा दाब मापणाऱ्या एका साध्या यंत्राचा अर्थात वायूदाबमापकाचा शोध लावला. लवकरच असे लक्षात आले की हवामानात जसजसे बदल होतात तसतसा हवेतील दाबही चढतो व उतरतो; सहसा दाबात घट झाल्यास वादळ येण्याचा संभव असतो. वातावरणातील आर्द्रतेचे मापन करणारे यंत्र अर्थात आर्द्रतामापक १६६४ साली तयार करण्यात आले. मग १७१४ साली डॅनियल फॅरनहाइट यांनी पाऱ्याचा तापमापक शोधून काढला. या उपकरणाच्या साहाय्याने अचूक तापमान मोजणे शक्य झाले.
आजही आपण अंगातील ताप मोजण्यासाठी वापरतो त्या तापमापीवर सेल्सियस सह फॅरनहाइट ची पट्टी असतेच पण बोलण्यात नेहमी गृहित धरले जाते ते फॅरनहाइट या एककाचे तापमान. (उदा. १०० डिग्री ताप)
डॅनियल गॅब्रियेल फॅरनहाइट यांचे १६ सप्टेंबर १७३६ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply