जर्मन तंत्रज्ञ रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म १८ मार्च १८५८ रोजी फ्रान्समधील पॅरिस येथे झाला.
त्यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. परंतु १८७० साली फ्रँको-प्रुसियन युद्धामुळे त्यांना फ्रान्स सोडून लंडनला जावे लागले. १८८० मध्ये उच्चतम श्रेणीत पदवी प्राप्त करून रुडॉल्फ डिझेल पॅरिसला परतले. तिथे त्यांनी म्युनिचमधल्या एका प्रोफेसरसोबत काम करून वातानुकूलित यंत्रणा व बर्फाच्या कारखान्याची रचना करण्याचे कार्य हाती घेतले. नंतर बर्लीन येथे नोकरी करत असताना एका नव्या पद्धतीच्या अंतज्र्वलन इंजिनाच्या कार्यपद्धतीबाबत पेटंट मिळविले. १८९३ साली त्यांनी कॅर्नोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले. थर्मोडायनॅमिक्सचा सखोल अभ्यास केल्यामुळे, इंजिनाची आखणी व रचना करणे त्यांना सहजशक्य झाले. त्याच वर्षी त्यांनी ‘एका नव्या तर्कशुद्ध इंजिनासंबंधीचे सिद्धांत व रचना’ हा शोधनिबंध लिहिला. पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते.
रुडॉल्फ डिझेल यांचे २९ सप्टेंबर १९१३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply